दोंडाईचा येथे परिवहन विभागाकडून रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन
दोडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचा विश्रामगृहावर दि. 15 रोजी RTO कॅम्प असल्यामुळे रस्तासुरक्षा सप्ताहचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक मोटर वाहन निरिक्षक ऋषिकेश सातपुते, रविंद्र शिंदे, पी.एस. लोखंडे या मान्यवरांच्या उपस्थितीत रस्ता सुरक्षा यावर प्रबोधन करण्यात आले. 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असुन नियमानुसार गाडी चालविण्याबाबत सुरक्षा घेण्याची काळजीबददल व्याख्यान देण्यात आले. त्यावर हेल्मेट वापरणे, गतीरोधक, नेत्र तपासणी, सिग्नल व शालेय विदयार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली
तसेच ड्रायव्हरांनी अक्सीडेंट झाल्यास पळुन न जाता पोलीस स्टेशनला सुचना देऊन सदर व्यक्तीस हॉस्पीटल मध्ये अॅडमीट करावे असे आपले कर्तव्य समजुन माणुसकीचे दर्शन घडवावे. यासर्व बाबींवर व्याख्यान करण्यात आले. या कार्याक्रमाचे आयोजक सेवा मोटर ड्रायव्हींग स्कुल चे संचालक रशिद मिर्झा, समीर मिर्झा, पंचशिल मोटर चे मनोहर वानखेडे, हरी चौधरी, रहिम शेख, प्रमोद, हितेश व इतर
मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
