सारंगखेडा येथे अस्वस्थ अवस्थेत पडलेल्या वृद्धाला संकल्प ग्रुप शहादा यांच्या सहकार्याने सुखरूप पोहोचवण्यात आले घरी




सारंगखेडा येथे अस्वस्थ अवस्थेत पडलेल्या वृद्धाला संकल्प ग्रुप शहादा यांच्या सहकार्याने सुखरूप पोहोचवण्यात आले घरी

 याबाबत सविस्तर माहिती अशी की सारंगखेडा येथील श्री दत्तप्रभू यांच्या पायथ्याशी असलेल्या गादीच्या दुकानाजवळ सदरील वृद्ध बाबा हे एका महिन्यापासून सारंगखेडा येथे अस्वस्थ अवस्थेत पडले होते तर त्यांचे जेवण व देखभाल सारंगखेडा येथील युवक अमन कलीम पिंजारी हे करीत होते

 मात्र दोन ते तीन दिवसापासून सदरील वृद्ध यांनी जेवण करणे बंद केले म्हणून त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती
 त्यानिमित्ताने शहादा येथील संकल्प ग्रुप चे राकेश कोचर यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी त्या वृद्धांनचा उपचारासाठी नंदुरबार येथील सिविल हॉस्पिटल येथे घेऊन जात होते. मात्र त्या वृद्धाचा म्हणणे असे होते की मला माझ्या राहत्या घरी सुलवाडा येथे सोडून द्या यावेळी संकल्प ग्रुपचे मेंबर्स पिनाकिन पटेल,संदीप जैन,राकेश कोचर,निलेश कापडणे ,आशिष छाजेड,सुरेश चव्हाण,मुकेश पटेल यांनी ॲम्बुलन्स द्वारे वृद्धास सारंगखेडा इथून सुरुवात व सुलवाडा येथे सोडण्यास गेले असता त्यांना माहिती मिळाली ती सदरील वृद्धाचे नातेवाईक हे दामोदर येथे राहण्यास गेले आहे ते त्यानंतर संकल्प ग्रुपच्या सर्व टीमने दामळदा येथे धाव घेत  सदरील वृद्ध यांना आपल्या घरी सुखरूप पोहोचवले

 संकल्प ग्रुपच्या  या कार्याबद्दल सारंगखेडा येथे सर्वत्र कौतुक केले जात आहे

 सदरील वृद्धास घरी पोहोचवण्यासाठी सारंखेडा येथील सह पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण, शहादा तालुका टायगर ग्रुप अध्यक्ष आकाश मालचे, राकेश कोळी,समीर पिंजारी, पत्रकार आकीब मणियार, शाहरुख मन्सुरी, अमन पिंजारी, शोएब पिंजारी, साहिल पिंजारी आदी इसमांनी परिश्रम घेतले
 व सारंगखेडा पोलीस स्टेशनचे अनमोल सहकार्य लाभले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने