*रोटरी स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रम ऊत्साहात साजरी**
दोंडाईचा अख्तर शाह
दोडाईचा येथील श्रीमती बसंतीबाई. पाबुदानजी संचेती प्री-प्रायमरी रोटरी इंग्लिश स्कूल व श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये साजरा करण्यात आलेल्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण संस्थाध्यक्ष श्री हिमांशु शाह यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वर्ग से सुंदर देश है हमारा, हम बच्चे अच्छे या देशभक्तीपर गीतांचे गायन, तेरी मिट्टी मे मिल जावा, लहरावो झेंडा या गीतांवर नृत्य हे सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच काटा,ज्यूडो,कुराश, स्ट्रेचिंग, तायक्वांदो या मार्शल आर्टची प्रात्यक्षिके व मत्स्यासन धनुरासन,सर्वांगासन,हलासन, पद्मासन या योगासनांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले.त्याचप्रमाणे सीबीएसईने आयोजित केलेल्या विभागीय ज्युडो स्पर्धेतील विजयी रोहन बच्छाव, स्केटिंग स्पर्धेत विजयी झालेले भक्ती पाटील अमेय तोरवणे, जान्हवी बडगुजर, कुलदीप राजपूत, रचिता पाटील,ऋग्वेद रावल, स्वराज्ञा लहासे,श्रोनित जाधव, गणेश वाघ, लोकेश मोरे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जय चौधरी, जयदीप गिरासे, कु.दिव्या कुवर, कु.क्रिशिका गिरासे यांनी आपल्या भाषणातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगून प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण भारतीयांसाठी सुवर्णमहोत्सव आहे. देशाची एकता अबाधीत ठेवण्यासाठी संविधानाची महत्त्वाची भूमिका आहे.संविधानातील मूल्ये व कर्तव्य आचरणात आणून एकता निर्माण करावी. लोकशाहीची यशस्वीता व देशाच्या संपन्नतेसाठी प्रत्येक नागरिकांची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे सांगितले.
प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक यांनी शिक्षण हे व्यक्तीविकास व देशविकासाचे महत्त्वाचे साधन आहे. समाजसेवेतून देशहिताचे कार्य करावे.असे मत मांडले.
ध्वजारोहणाचे प्रमुख पाहुणे श्री हिमांशु शाह म्हणाले की, आपण सर्व भारतीय या देशाचे सुजाण नागरिक आहोत. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले तर हीच खरी देशसेवा ठरेल. सविधानाच्या नियमावलीचे पालन करून संविधानाचा सन्मान करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.
या राष्ट्रीय सणाला शाळेचे उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी, संचालक श्री रमेश पारख, रोटरी क्लब ऑफ दोंडाईचाचे अध्यक्ष गुलामरसुल शेख ,सेक्रेटरी श्री सतिष पाटील ,रो.अनिश शाह रो. डॉ.चेतन बच्छाव,रो.अमितकुमार चित्ते,सौ. हेतल शाह, प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक.इंचार्ज बतुल बोहरी,पालकवर्ग व शिक्षक उपस्थित होते.
सूत्रसंचालन अक्षरा कापुरे वैष्णवी ठाकरे यांनी मानले तर आभार इन्चार्ज बतुल बोहरी यांनी केले.
