आशा व गटप्रवर्तक यांचे उपविभागीय कार्यालय शिरपूर येथे आक्रोश आंदोलन.

 


आशा व गटप्रवर्तक यांचे उपविभागीय कार्यालय शिरपूर येथे आक्रोश आंदोलन.

  शिरपूर :-  आशा व गटप्रवर्तकांच्या संपा दरम्यान मान्य केलेल्या मागण्यांच्या शासन निर्णय न काढल्याने दिनांक 12 जानेवारी 2024 पासून राज्यव्यापी संप सुरू केला आहे. या दरम्यान आज उपविभागीय कार्यालय शिरपूर येथे आक्रोश आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
      उपविभागीय कार्यालय शिरपूर येथील मा. अधिकारी यांना निवेदन दिले.मा. गटविकास अधिकारी ,मा . तालुका वैद्यकीय अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. त्या निवेदनात असे म्हटले आहे की, 18 ऑक्टोंबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता. त्यावेळी शासनाने आशा व गटप्रवर्तक यांना दिवाळी भेट दोन दोन हजार रुपये तसेच आशांना मिळणाऱ्या मानधनात सात हजार रुपयाची वाढ तर गटप्रवर्तकांच्या मानधनात दहा हजार रुपयाची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आजपर्यंत शासन निर्णय जाहीर केला नाही. नाशिक शहरात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येणार होते. त्यांची भेट घेऊन आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आशा व गटप्रवर्तक संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले सर यांनी शासनाकडून वेळ मागितली होती. परंतु त्यांना मा. मोदी साहेब यांना भेटण्याची परवानगी न देता नाशिक शहर पोलीस राजु देसले सर यांना एक दिवसासाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. अपमानास्पद वागणूक देण्यात आली. एकीकडे सरकार म्हणते आम्ही स्त्रीयांचा सन्मान करतो आणि दुसरीकडे स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नेत्यांना पोलीस कोठडीत ठेवून त्यांचा आवाज बंद करण्यात येतो. अशा सरकारचा धरणे आंदोलन करून आम्ही सर्व आशा व गटप्रवर्तक जाहीर निषेध करतो. आमच्या मागण्यांचा शासन निर्णय लवकर न काढल्यास येणाऱ्या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला.
    निवेदन देताना अशा गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाअध्यक्ष हिरालाल परदेशी ,तालुका अध्यक्ष अरूणा सूर्यवंशी, तालुका कार्याध्यक्ष स्मिता दोरीक, उपाध्यक्ष मालती इंदवे तसेच गटप्रवर्तक छाया चव्हाण, आशा मैराळे, आशा वडवी आशा कार्यकर्ती वैशाली बुवा, चंद्रकला कोळी, मनिशा बारी, यांच्यासह असंख्य आशा उपस्थित होत्या.

 तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य किसान सभा  लालबावटा शेतमजूर संघटनेतर्फे आशा व गट प्रवतक संघटनेचे राज्याध्यक्ष प्राध्यापक कॉ. राजू देसले यांनी नाशिक येथे दिनांक 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आशा व गटप्रर्वतक मागण्या संदर्भात निवेदन देण्याची प्रशासनाकडे परवानगी मागितली परवानगी तर दिलीच नाही परंतु त्यांना दिनांक 11/01/2024 रोजी अटक करण्यात आली. नाशिक शहर पोलीस स्टेशनचे एपीआय शिंदे यांनी अपमानास्पद वागणूक देऊन चार वाजेपर्यंत देखील जेवण दिले नाही त्यामुळे महाराष्ट्रातील आशा व गटप्रताकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. आहे. ठिकठिकाणी आंदोलने निदर्शने करून पोलीस स्टेशनचे एपीआय शिंदे यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे
शिरपूर येथे उपभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा लाल बावटा शेतमज युनियन तर्फे निदर्शने करून उपविभागीय अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर म. प्रमोद भामरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यामार्फत माननीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन माननीय देवेंद्रजी फडवणीस गृहमंत्री महाराष्ट्र शासन  यांना निवेदन पाठवून नाशिक शहरपोलीस स्टेशन एपीआय यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट हिरालाल परदेशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सल्लागार एडवोकेट मदन परदेशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शिरपूर तालुका सचिव एडवोकेट संतोष पाटील शिरपूर तालुका शेतमजूर युनियनचे अध्यक्ष भरत सोनार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव जितेंद्र देवरे एडवोकेट सचिन थोरात विजयसिंह राजपूत इत्यादी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने