निमझरी नाक्यावर 82 वर्षीय वृद्धाला संमोहित करून नागा साधुने पळविले 50 ग्रॅम सोन्याच्या दागिने,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद




निमझरी नाक्यावर 82 वर्षीय वृद्धाला संमोहित करून नागा साधुने पळविले 50 ग्रॅम सोन्याच्या दागिने,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद



शिरपूर -दिनाक 25 जानेवारी 2024 गुरुवार रोजी सायंकाळी साडे चार पाच वाजेच्या सुमारास कार मधून आलेल्या नागा साधूने निमझरी नाक्यावर 82 वर्षीय वृद्धाला संमोहित करून 2 तोळे वजनाच्या 2 सोन्याच्या अंगठ्या व 3 तोळे वजनाची अंगावरील सोन्याची चेन असे 3 लाख 4 हजार 500 रुपये किमतीचे दागिने घेऊन पसार झाल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 26 जाने वारी रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास  कट दाखल झाल्याने अज्ञात कार चालकासह अज्ञात नागा साधू विरुद्ध  गुन्हा नोंद करण्यात आला
         याप्रकरणी रोहिदास वामन पाटील, वय ८२  रा सांदिपनी कॉलनी,निमझरी रोड,शिरपूर या सेवानिवृत्त वृद्धाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारी नुसार 25 जानेवारी रोजी सायंकाळी साडे चार 5 वाजेच्या सुमारास निमझरी रस्त्यावरील डिव्हायडरवर बसलेला असतांना राखाडी रंगाचया कार मधून आलेल्या नागा साधुने त्यांचेजवळ बोलावून रस्ता कुठे जातो आणि महादेव मंदिर कुठे आहे असे हिन्दी भाषेतून विचारणा केली तसेच "आप दिल देते हे या लेते हैं "असे  बोलत असताना त्याने हातातील घड्याळ मागितल्याने त्यास दिली त्याने ते घडयाळ परत केले आणि हातात घालण्यास  सांगितले त्यांनतर त्यांने हाताच्या बोटात असलेल्या अंगठ्या व गळयातील चैन मागीतली असता स्वतःहून अंगठ्या व चेन नागा साधुचे हातात दिल्या असता संमोहित करुन गाडीच्या काचा बंद करुन तेथुन त्यांचे ताब्यातील कार घेऊन निघुन गेल्याची फिर्याद दाखल केली पुढील तपास पीएसआय सुरेश सोनवणे करीत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने