ज्ञानार्जनानेच मानवाचा सर्वांगीण विकास : जी.एल.जाधव समता माध्यमिक विद्यालयात जागतिक साक्षरता दिन उत्साहात साजरा, नाशिक शांताराम दुनबळे

ज्ञानार्जनानेच मानवाचा सर्वांगीण विकास : जी.एल.जाधव 
समता माध्यमिक विद्यालयात जागतिक साक्षरता दिन  उत्साहात साजरा,
नाशिक शांताराम दुनबळे



   नाशिक-:   ज्ञानार्जनानेच मानवाचा सर्वांगीण विकास शक्य झाला आहे.शिक्षित बनून सुसंस्कृत मानवी जीवन जगण्यासाठी सातत्याने ज्ञानप्राप्ती करता सातत्य,मेहनत,जिद्द-चिकाटी विद्यार्थ्यांनी विकसित केली पाहिजे असे मत समता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.एल.जाधवसर यांनी व्यक्त केले.
      ७ सप्टेंबर १९६५ रोजी युनेस्कोने घोषित केल्या प्रमाणे ८ सप्टेंबर १९६६ पासून जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो.शिक्षण,विज्ञान व सांस्कृतिक विकास ह्या त्रिसूत्री वर आधारित विद्यार्थी-नागरिकांचा विकास साधने हा उदात्त हेतू युनिस्को हाती घेऊन जगाला ज्ञान-विज्ञान व सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा आग्रह केला आहे तोच जगास तारक असल्याचे मत ह्यावेळी बोलतांना शरद शेजवळ यांनी व्यक्त केले. 
    विद्यालयात संपन्न झालेल्या जागतिक साक्षरता दिन कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद शेजवळ सर,सूत्रसंचालन व आभार हिरामण पगार सर यांनी मानले.हरिभाऊ सोनवणेसर,हरिभाऊ भागवतसर,विनोद सोनवणेसर, बाबासाहेब गोविंदसर,शिक्षकेत्तर कर्मचारी ज्ञानेश्वर झालटे,लक्ष्मण दाणे व विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने