तळोदा येथील आपासाहेब गिरधर एकनाथ माळी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा
तळोदा - आपासाहेब गिरधर एकनाथ माळी कला ,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा दिनांक 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म दिवसानिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख वक्ते जी .टी .पी. वरिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथील प्राध्यापक डॉक्टर माधव कौतिक कदम सर यांनी समाज घडवण्यासाठी शिक्षक किती महत्त्वाचा घटक आहे आजची पिढी शिक्षक होणे पसंत करत नाही यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्यामची आई ही एकांकिका देखील सादर करून त्यांनी विद्यार्थ्यांची मन जिंकून घेतली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस. एन. शर्मा सर यांनी विद्यार्थ्यांना अखंड परिश्रम घेऊन शिक्षणात कसं यश साधता येतं याविषयी मार्गदर्शन केले .कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी .बी. हुंबरे सरांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उत्स्फूर्त विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांबद्दल त्यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ज्योती मगरे, प्रास्ताविक प्रा.जयेश मगरे ,आभार प्रा.डॉक्टर ऋचा माळी मॅडम यांनी केले कार्यक्रमाला वरिष्ठ प्रा. सेगा तडवी, प्रा .उषा पावरा ,प्रा . प्रभावती वसावे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा .सुवर्णा गिरासे , प्रा. हेमंत चौधरी, प्रा. छोटू ठाकरे, एस. एन. एन. प्रमुख प्रा. नितीन मगरे , प्रा.रोहित पिंपरे, प्रा. संगम यशोध , प्रा. सुषमा टवाळे, प्रा. देवा मराठे, प्रा.किरण चव्हाण, प्रा रोहन माळी, प्रा. पूजा जैन, प्रा. स्वाती माळी, प्रा. निषाद माळी , प्रा. मोनेश वाघ सर्वांनी क्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक वृंद व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
