*आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालय भामपूर तालुका शिरपूर येथे शिक्षक दिवस उत्साहात साजरा*
*शिरपूर*:- आर.सी.पटेल भामपूर तालुका शिरपूर या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवसाच्या निमित्ताने शिक्षक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षकांचा गुलाबाचे पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला. डॉक्टर सर्वपल्ली यांच्या प्रतिमाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जगातील शिक्षकाची भूमिका याविषयीच्या विविध प्रकारच्या शिक्षकांची भूमिका करणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांनी शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली.
उत्कृष्ट शिक्षकाचे नंबर काढले गेले. परीक्षकांचे काम के. एस .कोळी सरांनी केले. डी.व्ही.ठाकरे सरांनी गुरुचे महत्व सांगितले. विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.पी. दिक्षित सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका फिजा पिंजारी व समीक्षा कासुदे यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान हृदया कोळी या विद्यार्थी शिक्षकेने साकारले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
