पालकमंत्री मा. ना. श्री. विजयकुमार गावित यांचे हस्ते 11 पोलीस दादाहा सेतू " उपक्रमाचे उद्घाटन..!! नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे

पालकमंत्री मा. ना. श्री. विजयकुमार गावित यांचे हस्ते 11 पोलीस दादाहा सेतू " उपक्रमाचे उद्घाटन..!!

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे 



नंदुरबार - पोलीस व जनता या दोघांमध्ये योग्य समन्वय ठेवणे, तसेच आदिवासी बांधवांना आवश्यक असणारे कागदपत्र, प्रमाणपत्रे काढणे तसेच ते कागदपत्र काढण्यासाठी मदत व मार्गदर्शन मिळावे यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे " पोलीस दादाहा सेतू " हा समाजोपयोगी उपक्रमाचे उद्घाटन दिनांक 10/09/2023 रोजी सकाळी 13.00 वाजता अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.ना.श्री. विजयकुमार गावित यांचे प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांचेसह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस दलामार्फत अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे सुरु करण्यात आलेल्या पोलीस दादाहा सेतू कक्षाचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. ना. श्री. विजयकुमार गावित यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मा. ना. श्री. विजयकुमार गावित याचा सत्कार पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी तर पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील व अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांचा सत्कार अक्क्लकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे यांनी केला. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले इतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. ना. श्री. विजयकुमार गावित यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले की, " जिल्हा पोलीस दल पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांचे नेतृत्वाखाली कायदा व सुव्यवथा राखण्याबरोबरच समाजोपयोगी कार्यक्रमात अग्रेसर असल्याचे सांगून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे पालकमंत्र्यांनी कौतूक केले. जिल्ह्यातील फार कमी प्रमाणात नागरिकांना शासनाच्या विविध योजना मिळत आहेत, परंतु जिल्हा पोलीस दलाने पोलीस दादाहा सेतू हा उपक्रम राबविण्याचे एक अत्यंत चांगले काम हाती घेतलेले आहे. जिल्हा पोलीस दल समाजोपयोगी उपक्रम राबवून प्रशासनाला मदत करत आहेत. तसेच पोलीस दल हे नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या ग्रामीण, दुर्गम, अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी राबवित असलेल्या पोलीस दादाहा सेतू या उपक्रमाबद्दल त्यांनी आभार व्यक्त करुन अभिनंदन केले. जिल्हा पोलीस दलास जी कोणती आवश्यक मदत लागेल ती सर्व मदत ते करण्यास तयार असलेबाबत आश्वासन दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. विजयकुमार गावित यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांशी

स्थानिक बोली भाषेत संवाद साधून त्यांना कोण-कोणते दाखले / प्रमाणपत्र याउपक्रमांतर्गत दिले जाणार आहेत याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित सर्व नागरिकांना केले.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना " नंदुरबार जिल्हा पोलीस दल हे नेहमी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच पोलीस व जनता संबंध वृध्दींगत व्हावे यासाठी देखील नंदुरबार जिल्हा पोलीस दल नेहमीच प्रयत्नशिल असतात. नंदुरबार जिल्हा पोलीस दल हे जनतेसाठी नव-नवीन उपक्रम राबवितात. जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येणारे विविध समाजोपयोगी उपक्रमांना जिल्ह्यातील नागरिक देखील तेवढ्याच उत्साहाने सहकार्य करतात त्याचाच भाग म्हणून एक वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आपला नंदुरबार जिल्हा अंमली पदार्थ मुक्त झाला. सर्व धर्मीय सण, उत्सव, महापुरुषांची जयंतीनिमित्त डी.जे. / डॉल्बी न वाजविजा पारंपरि वाद्य वाजवून साजरे केले त्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि इतर तोटे टाळण्यास नागरिकांच्या मदतीने पोलीस दलाला यश आलेले आहे" असे सांगितले.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने पोलीस दादाहा सेतू हा उपक्रम आदिवासी बांधवांच्या गरजा लक्षात घेवून त्यांना मदतीचा हात म्हणून हा उपक्रम सुरु केला आहे. या परिसरातील नागरिकांची परिस्थिती तालुका वि जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची नसते. बऱ्याचवेळा त्यांच्याकडे तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी विवि शासकीय कार्यालयात जाण्यासाठी एस.टी.चे पैसे नसतात किंवा विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्रे काढणे खर्चीक असते. शासकीय विभाग दाखले, प्रमाणपत्रे काढण्याचे काम निःशुल्क करतात, परंतु काही एजंट लोकांकडून त्यांचे आर्थिक शोषण होण्याची शक्यता असते. अशावेळी नागरिकांना एक मदतीचा हात म्हणून पोलीस दादाहा सेतू हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग व नागरिकांच्या मदतीने सुरु करतांना आनंद होत आहे. पोलीस दादाहा सेतू या उपक्रमामध्ये नागरिकांच्या पैशांची बचत व वेळेचा होणारा अपव्यय वाचणार आहे. तसेच सर्व कामे पोलीस दलाकडून विनामुल्य केली जाणार आहेत.

1

जिल्हा पोलीस दलातील एक अधिकारी व अंमलदार यांनी गडचिरोली जिल्ह्यात जावून तेथे प्रशिक्षण घेतले व त्याच धर्तीवर अक्कलकुवा तालुक्यात पोलीस दादाहा सेतू हा उपक्रम नंदुरबार जिल्हा पोलीस दल राबवित आहे. तसेच नंदुरबार जिह्यातील इतर तालुक्याच्या ठिकाणी देखील हा उपक्रम निश्चितपणे सुरु करण्यात येईल. या उपक्रमाचा सर्वात जास्त फायदा हा विद्याथ्यांना होणार आहे. जे विद्यार्थी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावू शकत नाही त्यांनी व इतर नागरिकांनी पोलीस दादाहा सेतू या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. पोलीस दादाहा सेतू या उपक्रमांतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला असून या कक्षामार्फत संबंधीतांना योग्य ते सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येईल. नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर पोलीस दलाच्या अशा समाजोपयोगी कार्यक्रमाचे उद्घाटन नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार, पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. ना. श्री. विजयकुमार गावित यांचेहस्ते पहिल्यांदाच होत आहे त्यामुळे त्यांचे व उपस्थित सर्व नागरिक, शासकीय विभागी यांचे आभार नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी व्यक्त केले.

त्यानंतर पोलीस दादाहा सेतू या उपक्रमांतर्गत जिल्ह्याचे पालकमंत्री यांचेहस्ते श्री. जोलसिंग वजेसिंग पाडवी रा. नाला ता. अक्ककुवा, श्री. दिनेश वाण्या वसावे रा. भांग्रापाणी ता. अक्कलकुवा यांना उत्पन्नाचा दाखला, श्री. अनिल मण्या राऊत रा. डाब ता. अक्कलकुवा, श्री. गोपाल कालुसिंग वळवी रा. पांढरामाती ता. अक्कलकुवा, श्रीमती सुनिता गोवल नाईक रा. चापडी पो. वडफळी ता. अक्कलकुवा, श्रीमती विद्याबाई सायसिंग पाडवी रा. नाला ता. अक्कलकुवा यांना अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला. कु. निकिता विलास बसावे रा. मोरांबा ता. अक्कलकुवा, करणसिंग लोथा पाडवी रा. भाबलपूर ता. तळोदा, कु.पुजा कृष्णा पाडवी रा. जानीआंबा ता. अक्कलकुवा यांचेसह 10 अर्जदारांना पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (चारित्र्य पडताळणी दाखला) प्रातिनिधीक स्वरुपात देण्यात आले. उत्पनाचा दाखला-05, अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला-04, 33 % महिला आरक्षण प्रमाणपत्र -01, पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (चारित्र्य पडताळणी दाखला)-17, जातीचा दाखला-08. रेशन कार्ड- 07, आभा कार्ड-38 असे तब्बल 80 दाखले / प्रमाणपत्रे देण्यात आले. सदरचा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवून अन्य ठिकाणी देखील लवकरच सुरु करुन तो यापुढे निरंतर सुरु राहिल.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणान्या सर्व मान्यवरांचे अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दिपक बुधवंत यांनी आभार व्यक्त केले. त्यानंतर जिल्हा पोलीस दलातील बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करुन कार्यक्रमाचा शेवट झाला.

सदर कार्यक्रमाचे वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दिपक बुधवंत, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. अजय वसावे, तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, मोलगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेश गावीत यांचेसह पोलीस अंमलदार, अक्कलकुवा, मोलगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने