बालकलाकार आर्य तेटांबे याने गोरगरिबांना शाल आणि खाद्यपदार्थ वाटून वाढदिवस केला साजरा. .. ! लालबाग-परेल (प्रतिनिधी-खलील शिरगांवकर)

 



बालकलाकार आर्य तेटांबे याने गोरगरिबांना शाल आणि खाद्यपदार्थ वाटून वाढदिवस केला साजरा. .. !


लालबाग-परेल (प्रतिनिधी-खलील शिरगांवकर)

दिनांक २२ ऑगस्ट रोजी बालकलाकार आर्य महेश्वर तेटांबे याचा १५ वा वाढदिवस, आर्यने लहानपणीच वडील महेश्वर तेटांबे यांच्या पावलांवर पाऊल ठेवत सामाजिक क्षेत्रांत भरारी घेतली असुन त्याने आतापर्यंत बऱ्याच लघुपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. तसेच अनेक सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. सध्या आर्य परेल येथील मनपाच्या साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल या शाळेत दहावी इयत्तेत शिकत असुन आर्यला लहानपणापासूनच अभिनयाची आणि समाजसेवेची आवड असल्यामुळे कोरोना काळात देखील आर्यने आपला वाढदिवस मास्क, सॅनिटायझर, पाणी बॉटल, फेस शिल्ड वाटप करून साजरा केला होता आणि याही वर्षी आर्य  याने आपला १५ वा वाढदिवस थाटात साजरा न करता गरीब गोरगरिबांना खाद्यपदार्थ वाटून आणि उबदार शाल प्रदान करून साध्या पद्धतीने साजरा करून आपले कर्तव्य सिद्ध केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने