*वरवाडे येथे श्रीकानुमातेच्या उत्सव आनंदोत्सवात साजरा*
शिरपुर— खान्देशात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी श्रीकानुमातेची स्थापना करण्यात येते दि.२० आॅगस्ट २०२३ रोजी वरवाडे येथे सोनवणे,जाधव,खलाणे,खैरनार परिवारात धार्मिक वातावरणात पुजा अर्चा करून श्रीकानुमातेची स्थापना करण्यात आली या उत्सवात
एक दिवस अगोदर सर्व एकत्र येऊन गहू जात्यावर दळून रात्रभर गाणी गायली जातात. श्रीकानुमातेचा उत्सव साजरा करत असतात सोनवणे परिवारातील मोठी कानुबाई येथे *तरुणतडफदार उद्योगपती मा.चिंतनभाई अमरीशभाई पटेल* यांनी श्रीकानुमातेचे दर्शन घेऊन आर्शिवाद घेतले संत सावता माळी भजनी मंडळ प्रत्येक श्रीकानुमातेच्या स्थापने स्थळी जाऊन संत भजन अभंग,भावगीत,गवळणीच्या तालावर गायन करत नाचत नाचत आनंद साजरा करत असतात तसेच महिला मंडळ ही श्रीकानुमातेचे गाणे एवढशी कानबाई लेकरवाई माय लेकरवाई अशा प्रकारे गायन करत रात्रभर जागर करत आनंद साजरा करतात दि.२१/८/२०२३ रोजी स.९ वा.मोठ्या उत्साहात डिजे वाजंत्री लावुन श्रीकानुमातेचे विसर्जन मिरवणुकीत भाविकांची गर्दी होती संपुर्ण गावातुन लहान थोर महिला भक्तांनी नाचत जणू सहभाग घेऊन आनंद साजरा करत अरुणावती नदीच्या किनारी शिरपुर वरवाडे नगर परिषदच्या सहकार्याने पाण्याची गाडी व्यवस्था करण्यात आली शेवटी श्रीकानुमातेची महाआरती करत विसर्जन करण्यात आले ,जय हरी कानुमाता की जय,कन्हेर राजा की जय,श्रीम्हाळसामाता की जय
