रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण**
दोडाईचा (अख्तर शाह)
दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूल व श्रीमती बसंतीबाई पाबुदानजी संचेती प्री- प्रायमरी रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये साजरा करण्यात आलेल्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण रोटरी क्लब ऑफ दोंडाईचाचे नवनिर्वाचित अध्यक्ष इंजिनिअर .गुलामरसुल शेख यांच्या हस्ते करण्यात आले. या राष्ट्रीय सणाला शाळेचे अध्यक्ष श्री. हिमांशु शाह, सौ. हेतल शाह, संचालक श्री पी.सी. शिंदे, श्री रमेश पारख, रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा चे सचिव श्री सतिश पाटील, प्राचार्य श्रुतिरंजन बारिक, रो.नामदेव थोरात, रो.अनिश शाह,सचिन शाह, राकेश जयस्वाल,डॉ.नितीन बिऱ्हाडे, डॉ.चेतन बच्छाव, अशोक कुचेरीया,श्रीकांत श्रॉफ, इंचार्ज बतुल बोहरी,पालक शिक्षक संघाचे सदस्य प्रविणसिंग गिरासे, कविता मराठे, भूपेंद्र पाटील,पालकवर्ग व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कु.नक्षत्रा राजपूत,कु.वैष्णवी ठाकरे,अथर्व चोंढाळकर,कार्तिक वेताळे,राजपाल गिरासे यांनी आपल्या भाषणातून ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून भारताला मुक्त करून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या देशभक्तांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या स्वप्नातील विकसित भारत निर्माण करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयांनी स्वीकारली असल्यामुळे येणाऱ्या आव्हानांवर मात करून आज जगात भारताने विशेष स्थान प्राप्त केले असल्याचे मत मांडले.
या राष्ट्रीय सणानिमित्त देशभक्तीपर गीतांवर नृत्य, भूमिकाभिनय, गीतगायन, पिरॅमिड व मार्शल आर्टचे प्रात्यक्षिक इ. कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळेत 'मेरी मिट्टी मेरा देश' अभियानांतर्गत देशभक्तांची वेशभूषा,तिरंगा रॅली, पंचप्रण प्रतिज्ञा, चित्रकला स्पर्धा इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्री रमेश पारख यांनी देशभक्तीच्या भावनेने सादर केलेल्या विद्यार्थ्यांच्या कालागुणांचे 'रोटरी स्कूलची झलक सबसे अलग' अशा शब्दांत कौतुक केले. ध्वजारोहणाचे प्रमुख पाहुणे श्री गुलाम शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन हा देशभक्तांच्या कार्याला वंदन करणारा व देशभक्तीची भावना रुजविणारा महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या देशभक्तांच्या विचारांचा अंगीकार भारतीयांनी केल्यामुळे चंद्रयान-3 यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले असून आपला भारत देश जगात महासत्ता म्हणून ओळखला जात आहे.सोशल मिडियाच्या आहारी गेलेल्या तरुणांना वाचवण्यासाठी शिक्षक व पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा महाजन यांनी केले,तर आभार संदीप सोनवणे यांनी मानले.
