थाळनेर येथील तेले वरिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण संपन्न..
शिरपूर -एम.जी. तेले वाणिज्य, सी. आणि बी.आर. तेले विज्ञान आणि के. तेले व्यवस्थापन महाविद्यालय थाळनेर ता. शिरपूर येथे मा. कुलगुरू महोदय यांच्या विषयाला अनुसरून ७५ वृक्ष लागवडीचा कार्यक्रम महाविद्यालयात आज संपन्न झाला.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.बी. मंगळे सरांनी भूषविले तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.जे.जी. पावरा, रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एच.डी. सोलंकी, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.सौ. डी.टी. गिरासे, प्रा.एस.व्ही. भोये, प्रा.पी.आर. कढरे, यांनी परिश्रम घेतले तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील उपस्थित होते..
