एस पी डी एम महाविद्यालयाचे क्रीडासंचालक प्रा. डॉ. एल.के प्रताळे यांची टोकियो,जपान आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड
शिरपूर: येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एसपीडीएम कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील क्रीडा संचालक डॉ.एल के प्रताळे यांची जपान सरकारने आयोजित केलेल्या क्रीडा व शारिरीक शिक्षण विषयावरील अधिकृत अंतरराष्ट्रीय परिषदे करीता निमंत्रित करण्यात आले आहे. ते सदर परिषदेत 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2023 दरम्यान सहभागी होतील.या कालावधीत जपान सरकारच्या क्रिडा विषयक धोरण,शालेय क्रीडा व शारिरीक शिक्षण, शासकीय क्रीडा प्रशिक्षण स्थळे आदींना भेटी देऊन अभ्यास करणार आहेत.सदर परिषदेत त्यांच्या INFLUENCE OF SPECIFIC TRAINING PROGRAMME ON PHYSIOLOGICAL COMPONENT OF INDIAN HIGH SCHOOL LEVEL BOXING PLAYERS या संशोधन पेपरची निवड झालेली आहे. आंतरराष्ट्रीय परिषदे करीता झालेली निवड ही संस्था व महाविद्यालयाचा अभिमान वाढवणारी असून सदर निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ तुषार जी रंधे, सचिव नानासाहेब निशांत रंधे, खजिनदार ताईसो.आशाताई रंधे, प्राचार्य डॉ.एस.एस राजपूत, कुलसचिव व विश्वस्त रोहित रंधे, उपप्राचार्य डॉ. फुला बागुल डॉ.एस.पी महिरे , उपप्राचार्य,प्रा. व्ही.ए चव्हाण ,नॅक समन्वयक डॉ.डी.डी भक्कड आणि एस.पी.डी.एम महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.
