पंचायत समिती परिसरात स्वातंत्र्यसैनिकांचा व शूरवीरांचा सन्मान करीत “मेरी माटी मेरा देश” अभियानाचा समारोप
सकाळी तिरंगा रॅली आणि कलश बाईक रॅली काढून पंचायत समितीने केले शहरात देशभक्तीपर वातावरण
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आयोजित मेरी मिट्टी मेरा देश अभियाना आमदार कांशीराम पावरा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य सैनिकांचा व शूरवीरांचा सन्मान करीत मोठ्या उत्साहात समारोप करण्यात आला.शिरपूर तालुक्यात मेरी मिट्टी मेरा देश अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आली या मोहिमेचा समारोप शिरपूर पंचायत समिती कार्यालयात आमदार काशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील जि.प.सदस्य डॉ तुषार रंधे, सभापती लताबाई पावरा,पोलीस विभागीय अधिकारी सचिन हिरे उपसभापती संजय बागुल गटविकास अधिकारी सोनवणे यांच्यासह पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य, तालुक्यातील सरपंच पंचायत समिती कर्मचारी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शहीद जवान व स्वातंत्र्य सैनिक यांच्या वारसाचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच पंचप्राण शपथ घेण्यात आली.मेरी मिट्टी मेरा देश अभियानाचा समारोप कार्यक्रमानिमित्ताने सकाळी पंचायत समिती कार्यालयापासून पाताळेश्वर चौकातील शहीद स्मारक पर्यंत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.यावेळी शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी विविध वेशभूषेत घोषणा देत सहभागी झाले.तर कार्यक्रमानंतर भव्य कलश मोटारसायकल रॅली काढण्यात आली.तालुक्यातील ग्रामपंचायत मार्फत आणलेले कलश प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.
