इंटर नॅशनल असोसिएशन फॉर सायंटिफिक स्पिरूचीयालीझम , मेरठ यांच्या मानस योग साधनेचे वरिष्ठ मार्गदर्शक डॉ. गोपाल शास्त्री यांचे व्याख्यान दोडाईचा (अख्तर शाह)




 धुळे , नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून दिनांक 26 ते 28 जानेवारी या तीन नंदुरबार , नवापूर , शहादा , दोंडाईचा , शिरपूर , धुळे येथे त्यांच्या 
" रोग ,कारण व त्यांचे निवारण " याविषयावर मोफत मार्गदर्शन  पर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
         आजच्या गतिशिल तसेच प्रदूषणयुक्त , तणावग्रस्त जीवन शैली मुळे विविध आजारांचे प्रमाण सर्वत्र वाढले आहे. केवळ योग्य आहार प्रणाली , ध्यान व योगाच्या माध्यमातून गंभीर व्याधी व आजारांवर देखील मात करता येते. हे या व्याख्यानातून सप्रमाण मांडण्यात येणार असून उपस्थितांच्या शंका समाधान , प्रश्न उत्तरे देखील होणार आहेत . दि 26 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अग्रवाल भवन , नंदुरबार येथे तर त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता नवापूर येथे लक्ष्मी पार्क गांधी पुतळ्याजवळ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि 27 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता शहादा येथील अन्नपूर्णा लॉन , पटेल रेसिडेन्सी समोर डोंगरगाव रोड येथे तर सायंकाळी 5 वाजता दोंडाईचा येथील ओम शांती गार्डन लक्ष्मी कॉलनी येथे व्याख्यान होणार आहे. दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता शिरपूर येथील किसान विद्याप्रसारक संस्थेचे एस पी डी एम् कॉलेज सभागृहात व्याख्यान होणार असून सायंकाळी 5 वाजता धुळे येथील पूज्य बहावलपुरी पंचायत येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व व्याख्यान विनामूल्य असून जास्तीत जास्त नागरिकांनी या अनमोल व्याख्यान व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा , असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने