मुंबईतील अभिनेत्याला पुण्यात आणून मारहाण प्रतिनिधी दत्ता पारेकर





पुणे: मुंबई येथील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला पुण्यात डांबून ठेवण्यात आले होते. कुर्ला पोलिसांनी चार ते पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून आरोपींच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर पोलिसांनी अखेर प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्गावर एका अभिनेत्याचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना वीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. तक्रारदार व्यक्ती यांनी दिल्लीतील एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेले होते मात्र हफ्ते भरले नाहीत म्हणून त्यांच्या ओळखीच्या भरत भाई मेहताब खान आणि विकी पैलवान या दोन व्यक्तींनी तुम्हाला अधिक कर्ज मंजूर करून देतो असे सांगत गाडीत बसवले आणि पुण्याला नेऊन एका रूममध्ये डांबून मारहाण केली.

त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या लेटरहेडवर तुमच्या अकाउंटमधून तुम्हाला चार कोटी रुपये रक्कम आम्ही देणार असे देखील त्यांच्याकडून लिहून घेतले आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. काहीतरी प्रयत्न करून अखेर आरोपींच्या तावडीतून त्यांनी सुटका करून घेतली आणि तात्काळ पोलीस ठाणे गाठून आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने