पुण्यात बसमध्ये महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न आला अंगलट प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:बसमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या विकृत व्यक्तींची काही कमी नाही. अनेकदा महिलांसोबत अरेरावीची भाषा वापरत शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न अनेक जण बसमध्ये करत असतात. अशीच एक घटना पुण्यात समोर आलेली असून पुणे महापालिकेपासून तळेगाव ढमढेरे येथे जाणाऱ्या एका बसमध्ये महिलेशी लगट करणाऱ्या एका आरोपीला विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, नवल बाळकृष्ण पाटील ( वय 48 राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. पीडित महिला पुणे महापालिका ते तळेगाव ढमढेरे या बसमध्ये प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेत त्याने आपल्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला असे महिलेचे म्हणणे असून त्यानंतर महिलेने आरडाओरडा सुरू केला होता.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने