दुसऱ्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परिक्षेचा अभ्यासक्रमात बदल न करता, दुसऱ्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा जाहीर करा..युवाशाही संघटना महा राज्य







धुळे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त यांना युवाशाही संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आली आहे की राज्यात पहिल्या टप्प्यात 30 हजार पदांची भरती करणार असे शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितले आहे. यासाठी परीक्षेचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात करणार असे ही मंत्री महोदयांनी वेळोवेळी हिवाळी अधिवेशनात सांगितले, पण या परीक्षा संदर्भात आता पर्यंत एक ही शासन निर्णय, परिपत्रक, कोणत्या ही प्रकारच्या सूचना विभागाने लिखित स्वरूपात दिल्या नाहीत. जर फेब्रुवारी मध्ये परीक्षा होणार तर कमीत कमी दोन महिने आधी सूचना येणे गरजेचे होते. हयासाठी होणारी परीक्षा कोणामार्फत, कोणत्या अभ्यासक्रमाची असेल परीक्षेचे स्वरूप काय असेल याची माहिती अजूनही विभागाने दिली नाही, ती माहिती केव्हा पर्यत येईल. खर तर परीक्षेच्या आधी जाहिरात येते रिक्त पदाची माहिती सुध्दा येते पण, त्या संदर्भात सुद्धा कोणतेही पत्र आले नाही. या बद्दल लवकरात लवकर शासन निर्णय काढण्यात यावे ही विनंती.

16 डिसेंबर पर्यंत दुसऱ्या अभियोग्यता संदर्भात नोटीफेकेशन येणार आहे असे सुमोटो याचिका मध्ये शिक्षण विभागाने दिलेल्या संभाव्य वेळापत्रकात म्हटल होते. त्यांनतर कोटोने त्यांना 31 डिसेंबर पर्यत जाहीर करा असे ही सांगितलं होते. पण शिक्षण विभाग असे केले नाही. त्यानंतर परीक्षा परिषद आयुक्त ऑफीस, शिक्षण विभाग मंत्रायल येथे वेळोवेळी पाठपुरावा केला फक्त आश्वासन भेटली पण कार्यवाही अजिबात झाली नाही आणि आता पर्यंत नोटीफिकेशन नाही आली. म्हणून संपूर्ण पात्र उमेदवाांकडून युवाशाही संघटनेच्या माध्यमातून आपणास  विनंती केली आहे . येत्या 24 तारखे पर्यंत नोटिफेक्षन जाहीर करावी. आणि परीक्षेच्या आधी रिक्त जागा जाहीर करण्यात याव्यात आणि लवकरात लवकर शिक्षक पदे भरती करण्यात यावी. तसेच कोर्टात सांगितल्या प्रमाणे आणि उमेदवारांना मध्ये सतत निर्माण होणाऱ्या संभ्रमामुळे अभ्यासक्रम जाहीर करावा, अन्यथा कोर्टात सांगितल्या प्रमाणे कोर्टाच ही उल्लघण आपण केले जर 24 जानेवारी पर्यंत दुसऱ्या TAIT ची नोटीफिकेशन जाहीर झाली नाही तर त्यांनंतर इमेदवाराच्या भावना सोबत खेळ केल्यामुळे आम्ही संघटनेच्या वतीने मुंबई येथे जलसमाधी आंदोलन केले जाईल.

पहिल्यांदा परीक्षा घेतली तेव्हा खूप मुलांचे नाके वाढले आणि जेव्हा परीक्षा झाली तेव्हा जो निकाल लागला त्याच्या पहिल्या निकालाची प्रत सुध्दा उपलब्ध नाही. त्यामुळे या परीक्षेत परीक्षा घेताना परीक्षा हॉल मध्ये परीक्षा झाल्यावर उमेदवारांनी जे पेपर देतील त्याची हार्ड कॉपी ही तारीख, वेळ, ठिकानाचा उल्लेख करून देण्यात यावी ही नम्र विनंती,
अशा आशयाचे निवेदन युवाशाही संघटना महा राज्य यांच्या वतीने देण्यात आले आहे.
सदरच्या निवेदनावर तुषार देशमुख, प्रल्हाद भोसले, रामधन ठोंबरे, तुषार शेटे, विजय पाटील इत्यादींच्या सह्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने