मोती माता यात्रा उत्साहात संपन्न.*




*बभळाज प्रतिनिधी.*

दि.०६ ते ०७ जानेवारी २०२३ दोन दिवस चालणारी मोती माता यात्रा उत्साहात संपन्न.

सालाबादप्रमाणे पौष शुद्ध पौर्णिमा दि.०६ जानेवारी २०२३ रोजी मौजे नागेश्वर शिवार अजनाड बंगला येथील मोती माता देवीच्या ४४ व्या प्रकट दिनानिमित्त नियोजित यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.



 मा श्री. भूपेश भाई पटेल अध्यक्ष श्री. नागेश्वर सेवा संस्थान अजनाड बंगला, व मोती मातेचे पुजारी श्री. परशुराम महाराज जाधव (बभळाज) यांच्या हस्ते मातेचे विधिवत पूजन करण्यात आले.

 मोती माता भक्त संस्थापक (दिवंगत मंडाआई रा. बभळाज ता. शिरपूर. जी.धुळे.) यांच्या निवासस्थानावरून दी. ०६ जानेवारी २०२३ शुक्रवार रोजी सकाळी ७ वाजेला मंडाआई यांचे कनिष्ठ सुपुत्र तोताराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मोती मातेचा ध्वज व गुणा महाराज यांच्या ध्वजाची गावातील सर्व जाती धर्मातील लोकांनी मिरवणूक काढत श्री. क्षेत्र नागेश्वर परिसरातील मोती माता मंदिरावर ध्वज आणत, मा. श्री. भूपेश भाई पटेल यांच्या हस्ते ध्वज लावण्यात आले. व मोती मातेची विधिवत पूजा करून यात्रेला सुरवात झाली.

या यात्रेला महाराष्ट्र आणि
 मध्यप्रदेश राज्यातून प्रत्येक वर्षी हजारोच्या संख्येने भाविक भक्त यात्रेनिमित्त मोती मातेचे दर्शन घेण्यासाठी येत असतात, त्याचबरोबर मागील दोन वर्ष हे कोरोच्या सावटाखाली गेल्याने शासनाने घालून दिलेल्या नियमात भक्तांनी मनोभावे दर्शन घेतले.
परंतू यावर्षी भारतात कोरोना सारख्या विनाशकारी व्हायरसची भीती नसल्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यातून हजारोच्या संख्येने येऊन भक्तांनी यात्रेला हजेरी लावली, आणि यात्रेचा उत्साह वाढवला.
अशा प्रकारे दोन दिवसीय यात्रा उत्साहात संपन्न झाली.

यावेळी नागेश्वर ट्रस्ट चे सदस्य संजय चौधरी, मा. पंचायत समिती सदस्य दर्यावसिंग जाधव, बभळाज गावाचे सरपंच जगन्नाथ महाजन, अजनाड बंगला येथील सरपंच दरबार जाधव, पत्रकार राज जाधव, मा. पं. स. सभापती  पदमसिंग जाधव, अनार जाधव, प्रकाश पाटील, संतोष जाधव, नन्ना जाधव, अजमल जाधव, गोविंदा राठोड, मा. सरपंच रोहिदास जाधव, यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने