भोरगिरी श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांत सामाजिक होतेय बांधिलकीची जाणीव प्रतिनिधी दत्ता पारेकर

 


पुणे:कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय डेहणे या महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर  नुकतेच भोरगिरी येथे संपन्न झाले, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबर सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी, श्रमदानाचे संस्कार रुजावेत या हेतूने  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

      शिबिर सांगता समारंभाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली, प्रमुख पाहुणे  जनता शिक्षण संस्थेचे माजी सेक्रेटरी श्याम पवार यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले, संस्थेचे सचिव शिवाजीराव मोहिते यांनी विद्यार्थ्यांना अनुभवाचे लेखन करण्याचा सल्ला दिला, कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल  वनघरे यांनी मोबाईलचा सदुपयोग करून अभ्यास करावा असे सांगितले, शिबिरातील विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले.

      कार्यक्रम समन्वयक प्रा.सीलदार पावरा  यांनी मागील सात दिवसांच्या कामाचे अहवाल वाचन केले,

 कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्योजक फडके, चेअरमन लक्ष्मण काठे, मुख्याध्यापिका मोरमारे , माजी विद्यार्थी सेवा संघ अध्यक्ष कुमार पवन थोरात, महाविद्यालयाचे प्राध्यापक,इतर  कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते, प्राचार्य डॉ. जयराम खाडे यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन जगदाळे सर तर आभार प्रदर्शन रानवडे सरांनी केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने