पुणे: एकाच कुटुंबातील चार जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे . मयत व्यक्तींमध्ये पती पत्नी आणि दोन मुलांचा देखील समावेश असून मुंढवा परिसरात यानंतर खळखळ उडालेली आहे. विष प्राशन करून एकाच कुटुंबातील चारही व्यक्तींनी आत्महत्या केल्याने परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
उपलब्ध माहितीनुसार, दीपक थोटे ( वय साठ ) इंदू दीपक थोटे ( वय 45) त्यांचा मुलगा ऋषिकेश दीपक थोटे ( वय 24 ) आणि मुलगी समीक्षा दीपक थोटे ( वय 17 ) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी ते मुंढवा परिसरातील केशवनगर येथे राहायला आलेले होते.
शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचे काम करत असलेले दीपक थोटे गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडलेले होते. शेअर मार्केटमधील नुकसान काही केल्या भरून येत नसल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केलेली आहे.
