शिरपुर : - तापी नदी पुलावर क्रूझर वाहनाचा टायर फुटल्याने वाहन पलटी झाल्याने 4 ते 5 जण जखमी झाले तर त्यांना वाचविण्याचा प्रयत्नांत आयशर नदी पुलावरून नदी पात्रात कोसळल्याने अपघात झाल्याची घटना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपुर तालुक्यातील सावळदे जवळ सोमवारी रात्री 8 ते साडे 9 वाजेच्या सुमारास घडली. मिळलेल्या माहितीनुसार क्रूझर व आयसर हे दोन्ही वाहने भरधाव वेगात शिरपूर कडे जात असताना तालुक्यातील सावळदेलगत तापी नदी पुलावर क्रूझर वाहनाचा अचानक टायर फुटला. त्यामुळे पुढच्या अपघातग्रस्त क्रूझर वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात आयशर चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने सदर आयशर वाहन पुलाचे कठडे तोडत नदी पात्रात कोसळले. या भीषण अपघातात क्रूझरमधील 4 ते 5 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात अम्ब्युलसन्स हलविण्यात आले होते. तर नदी पात्रात पडलेल्या आयशरमध्ये ड्रॉयव्हर आहे. तर नदी पात्रात पडलेल्या आयशरमध्ये ड्रॉयव्हर किती जण होते आणि त्यांचे काय झाले याबाबत अंधार असल्याने अधिकृत समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस, नरडाणा पोलीस आपल्या पोलीस पथकासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अंधार असल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण झाला होता. मदत कार्य युद्धपातळीवर सुरू असून नदीपात्रात गेलेल्या ट्रकच्या शोध घेतला जात आहे.
