एन मुक्ता चा झंझावात - प्रचार दौरा यशस्वी




कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या विविध प्राधिकरणांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संचालित एन मुक्ता संघटनेचा प्रचार दौरा आज यशस्वीरित्या संपन्न झाला. प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अग्रेसर असणारी संघटना म्हणून एन मुक्ता कार्यरत असून विद्यापीठ प्राधिकरणाच्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरलेली आहे. संघटनेचा आजचा प्रचार दौरा धुळे तालुक्यातील कुसुंबा महाविद्यालयापासून सुरू झाला. या प्रसंगी प्रा. डॉ दीपिका अनिल चौधरी ह्या सिनेटवर बिनविरोध निवडून आल्या बद्दल त्यांचे व डॉ.अनिल चौधरी आणि डॉ.दिनेश भक्कड यांची अभ्यास मंडळावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल डॉ नितीन बारी यांनी बुके व शाल देऊन सत्कार केला. या प्रचार दौऱ्याचे नेतृत्व संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन बारी आणि सचिव प्रा. डॉ. अविनाश बडगुजर हे करत होते. या प्रचार दौऱ्या दरम्यान विविध प्राधिकरणांवर वेगवेगळ्या प्रवर्गातून उभ्या असणाऱ्या उमेदवारांचा परिचय म्हासदी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील यांनी करून दिला. तर उपस्थित सर्व प्राध्यापकांना संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष  डॉ. नितीन बारी यांनी संबोधित केले.

आपल्या संघटनेच्या कार्याची भूमिका मांडत असताना त्यांनी सांगितले की. एन मुक्ता ही संघटना प्राध्यापकांशी संबंधित विविध पातळीवरच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिलेली असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इतिहासामध्ये नोंदी घेतल्या जातील अशी विविध कार्य संघटनेने गेल्या पाच वर्षात केलेली आहेत. प्राध्यापकांचे केंद्रीय पद्धतीने होणाऱ्या पदोन्नत्या, स्थानिक निरीक्षण समितीवर होणाऱ्या नियुक्त्या, परीक्षा, राष्ट्रीय सेवा योजना, विभाग विद्यार्थी विकास,  संशोधन विभाग, प्रशासन, संलग्नता विभाग, गोपनीय विभाग, व्याख्याता मान्यता विभाग या आणि अशा विविध विभागांतर्गत होत असलेल्या कामकाजामध्ये प्राध्यापकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी एन मुक्ता संघटना सुरुवातीपासूनच अग्रेसर राहिलेली असून प्राध्यापकांच्या समस्यांना सोडवून त्यांची शैक्षणिक वाटचाल सुकर करण्याचं कार्य संघटनेने मोठ्या हिरीरीने केलेले आहे. संघटनेने या पुढील पंचवार्षिक साठी प्राधिकरणावर नियुक्त केलेल्या उमेदवारांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य वर्णन करताना डॉ. बारी पुढे म्हणाले की, आमचे सर्व उमेदवार हे पूर्ण पाच वर्षाची टर्म पूर्ण करणारे तरुण तडफदार आणि अनुभवी उमेदवार असून कोणत्याही प्राधिकरणावर किंवा कोणत्याही प्रवर्गातून निवडून गेलेला उमेदवार निवृत्त न होता तो त्याच्या संपूर्ण टर्म मधील कामकाज यशस्वीरित्या व सक्रियपणे तसेच सक्षमपणे पूर्ण करेल आणि मुक्ता संघटनेने आज पर्यंत कोणताही मोबदल्याची अपेक्षा न करता आणि कुठल्याही प्रकारचा मोबदला कोणत्याही स्वरूपामध्ये न घेता प्राध्यापकांच्या महाविद्यालय, संस्था, विद्यापीठ तसेच शासन स्तरावरील विविध समस्या व प्रश्न सोडविलेले आहेत यामुळेच या कामकाजाची दखल घेऊन विद्यापीठ प्राधिकरणातील बहुतांश तरुण प्राध्यापक वर्ग संघटनेच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून संघटनेच्या कार्यप्रणाली संदर्भामध्ये समाधान व्यक्त करत आहेत. 

या दौऱ्या दरम्यान कुसुंबा महाविद्यालय, म्हसदी महाविद्यालय, साक्री महाविद्यालय, दहिवेल महाविद्यालय तसेच विसरवाडी आणि नवापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान तसेच शिक्षण शास्त्र महाविद्यालयांमध्ये संघटनेचा प्रचार करण्यात आला. तसेच याप्रसंगी सि.गो. पाटील महाविद्यालय साक्री ला नॅक पुनर्मूल्यांकानात 'अ' दर्जा प्राप्त झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने प्राचार्य आर आर अहिरे यांचा  सत्कार करण्यात आला. प्रत्युत्तरात प्राचार्य डॉ.आर.आर.अहीरे यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करून निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्यात एवढी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी हे मुक्ता संघटनेच्या कार्यालयात उस्फूर्त प्रतिसाद दिला. 

एन. मुक्ता तर्फे अधिसभेवर खुल्या प्रवर्गातून
१. डॉ.गजानन पांडुरंग पाटील
२. डॉ.शिवाजी बन्सीलाल पाटील
३. डॉ.केतन प्रेमचंद नारखेडे
४. डॉ.कांचन दशरथ महाजन
५. डॉ.पंकजकुमार शांताराम नन्नवरे

अधिसभेवर एससी प्रर्वर्गातून डॉ.अरविंद रामभाऊ कांबळे

अधिसभेवर एसटी प्रर्वर्गातून डॉ.अजय शालीग्राम पाटील

अधिसभेवर व्हीजेएनटी प्रर्वर्गातून डॉ. धीरज रतिलाल वैष्णव

अधिसभेवर ओबीसी प्रर्वर्गातून डॉ. सुनील विक्रम कुंवर

अधिसभेवर महिला राखीव प्रर्वर्गातून डॉ.इंदिरा संतोष पाटील

विद्यापरिषदेवर मानव विद्याशाखेत खुल्या प्रर्वर्गातून डॉ.अविनाश योगराज बडगुजर

विद्यापरिषदेवर मानव विद्याशाखेत ओबीसी प्रर्वर्गातून डॉ.हिरालाल रामदास चौधरी

विद्यापरिषदेवर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत खुल्या प्रर्वर्गातून डॉ.किशोर नीलकंठ बोरसे

विद्यापरिषदेवर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत खुल्या प्रर्वर्गातून डॉ.मधुलिका अजय सोनवणे

हे सर्व उच्चशिक्षित, उच्च विद्याविभूषित उमेदवार निवडणूक लढवीत आहे.

प्रचारादरम्यान सर्वच महाविद्यालयामध्ये उपस्थित प्राध्यापकांकडून जल्लोषात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे व प्रचारासाठी आलेल्या सर्वच उमेदवारांचे आणि प्रचारकांचे स्वागत करण्यात आले. एन.मुक्ता संघटनेचा विजय असो, प्राध्यापक एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता. संघटनेला मिळालेला अभूतपूर्व असा प्रतिसाद पाहता एन.मुक्ता ही संघटना या प्राधिकरणाच्या निवडणुकांमध्ये एकतर्फी विजय मिळवेल यात शंका नाही.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने