पिंपळनेर - पिंपळनेर शहर तसेच सामोडे गावात घरफोडी चोरी करणारी टोळी जेरबंद करून गुन्हयातील २५०००/- रु. रोख मुददेमाल हस्तगत करत पिंपळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक ३१ / १२ / २०२२ रोजी पिंपळनेर शहरातील हरीओम नगर येथील श्री दिलीप आनंदा महाजन यांचे राहते घरी | बंदा घराचे कुलूप तोडून घरफोडी चोरी केल्याने पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे सी. सी. टी. एन. एस. गुरनं. ०२ / २०२३ भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सामोडे गावात दिनांक ०९/०१/२०२३ रोजीचे रात्री ०९.०० ते दिनांक १०/०१/२०२३ रोजीचे सकाळी ०७.०० वा दरम्यान एकाच रात्रीत ५ ठिकाणी वेगवेगळया बंद घरात चोरीचा प्रकार झालेला होता. त्याबाबत पिपळनेर पोलीस स्टेशन येथे दिनांक १३/०१/२०२३ रोजी तक्रारदार श्री किरण विलास घरटे वय २८ धंदा शेती रा सामोडे ता साक्री यांनी तक्रार दिल्याने सीसीटीएनएस गुरंन - ०८ / २०२३ भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे सन २०२३ सुरुवातीच्या महिन्यात घरफोडीचोरी करणारी टोळीने पिंपळनेर शहर, तसेच | सामोडे गाव परिसरात बंद घराना टार्गेट करुन जनतेचे मालमत्तेचे नुकसान होत असल्याने ग्रामस्थां मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर मालमत्ते संदर्भात दाखल गुन्हयाची गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक साो. श्री. संजय बारकुड, मा अपर पोलीस अधिक्षक श्री किशोर काळे यांनी सदर गुन्हे तात्काळ उघडकीस आणणे तसेच मालमत्तेचे गुन्हे प्रतिबंध होणे बाबत विशेष सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हददीत सदर गुन्हे उघडकीस आणणे करीता विशेष पथक | नेमण्यात आले होते. रात्रगस्त पेट्रोलींग सक्तपणे करुन गुन्हयांना आळा बसावा यासाठी अतिरिक्त पोलीस अंमलदार नेमण्यात आले होते.
सदर दाखल गुन्हयांचे तपासाचे अनुषंगाने पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे आरोपी नामे आरोपी रुपेश शशी पवार वय १८ वर्ष ३ महिने याचे सोबत ३ विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले होते. त्यांना विश्वासात घेवून वरील गुन्हयाबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हे केल्या बाबतची कबुली दिली आहे. सदर आरोपीतांकडुन गुन्हयातील २५०००/- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपीतांची घरफोडी चोरी करुन मौजमजा करण्याच्या सवयीचे असल्याने त्याकरीता त्यांनी घरफोडीचोरी केल्याची तपासात कबुल केले आहे.
सदर गुन्हयाचे तपासात वरील तिनही विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले असुन मा बाल न्यायालय धुळे येथे हजर करण्यात आले आहे. तसेच आरोपी रुपेश शशी पवार रा पिंपळनेर यास अटक करण्यात आली असून साथीदार पवन ऊर्फ पांग्या उत्तम भवरे यांचा शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्हयाच्या तपासा मध्ये इतर मालमत्ते संदर्भातील इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे
अशा प्रकारे पिंपळनेर शहरातील तसेच पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावातील नागरीकांना विशेष आवाहन करण्यात येते की, सदर आरोपीतांची गुन्हे करण्याची पध्दत ही बंद घरावर पाळत ठेवून रात्री चोरी करण्याची असल्याने गावी जात असतांना आपले घर अगर परिसरात रात्रीचे लाईट लावणे शेजारील राहणारे लोकांचे मोबाईल नंबर जवळ बाळगणे बाहेरगावी जातांना सोन्या चांदीचे दागीने रोख रक्कम घरात न ठेवता बॅन्क अगर सुरक्षीत ठिकाणी ठेवणे, आजुबाजुला कॉलनी अगर घर परिसरात कोणीही संशयीत इसम दिसुन आल्यास तात्काळ पोलीस स्टेशन अगर डायल ११२ वर संपर्क करून सदर बाबत माहीती दयावी.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय बारकुंड सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदिप मैराळे सो यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक सचिन साळुंखे, पोसई/बी.एम मालचे, असई / बी. आर पिंपळे, पोहेकॉ / कांतिलाल अहिरे, पोना / प्रकाश मालचे, पोकों/ हेमंत पाटोळे, पोकों / राकेश बोरसे, चालक पोकों / रविंद्र सुर्यवंशी, चालक पोकों/पकज वाघ, पोकों/ विजयकुमार पाटील, पोकों/सोमनाथ पाटील, चालक पोकों / नरेंद्र परदेशी अशांनी केली आहे.
