प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील सराईतांची झाडाझडती ३७ जणांना अटक प्रतिनिधी दत्ता पारेकर





पुणे: पोलिसांनी ऑपरेशन कोम्बिंगद्वारे झाडाझडती घेतली. पोलिसांनी मध्यरात्री राबविलेल्या या विशेष मोहिमेत सराइतांची चौकशी करण्यात आली. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी 37 जणांना अटक करण्यात आली असून त्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. सराइतांकडून 27 कोयते, चाकू, कुर्‍हाड, तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. 

पोलिसांनी शहरातील सराईत गुन्हेगारांना जरब बसविण्यासाठी विशेष मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) हाती घेतली आहे.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा, रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, संदीप सिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, विजयकुमार मगर आणि गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचार्‍यांनी मध्यरात्री विशेष मोेहीम राबविली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने