मुक मोर्चा द्वारे तहसील कार्यालयावर धडक ' सम्मेद शिखरजी ' साठी शिरपूर चा सकल जैन समाज एकवटला : महासतींचा मूक मोर्चात सहभाग




   
 शिरपूर :  झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी या पवित्र तीर्थक्षेत्राचा केंद्र पर्यटन स्थळाचा यादीत समावेश झाला आहे या तीर्थस्थळाचे पवित्र राखण्यासाठी शिरपूर चा सकल जैन समाज एकवटला आहे बुधवार रोजी शहरातील तहसील कार्यालयामार्फत  यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून केंद्र शासनाने  निर्णय मागे घ्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली 



 झारखंड मधील जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री सम्मेद शिखरजी जैन तीर्थक्षेत्रास झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्राचा दर्जा दिल्याच्या निर्णयाने बुधवारी शिरपूर येथील सकल जैन समाजाने जोरदार निषेध व्यक्त केला शहरातील जैन समाजातील छोटे मोठे व्यावसायिक व व्यापाऱ्यांनी आपापल्या आस्थापन बंद ठेवून कडकडीत बंद पाळला जैन व्यावसायिकांच्या या बंदला पाठिंबा म्हणून अन्य धर्मिय व्यवसायिक ही या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते दरम्यान सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्राचा पवित्र दर्जा कायम रहावा यासाठी सकल जैन समाजार्फे शिरपूर शहरातून मुक मोर्चा काढण्यात आला होता याप्रसंगी जैन धर्मियांचे साध्वी श्री परमपूज्य नम्रव्रता श्री जी म.सा. , साध्वी श्री परमपूज्य जितेशरत्ना श्री जी. मी.सा. आदी ठाणा आठ जैन साध्वींचा देखील मुक मोर्चात सहभाग होता 

  शहरातील जैन मंदिरात मंगल पाठ करून मुक मोर्चास प्रारंभ झाला काॅ़ग्रेस भवन , विजय स्तंभ , तरण तारण जैन चैत्यालय ,  अंबिका नगर , नुतन जैन स्थानक मार्गाने मुक मोर्चा काढण्यात आला भले मुक मोर्चा शांततेत होता पण मुलामुलींच्या हातात ' जैन धर्म महान है , ... सम्मेद शिखरजी हमारी शान है ' अशा  विविध घोषणाबाजी चे फलक दिसून येत होते 
सकल जैन बांधवांनी मांगणीच्या अनुषंगाने काढलेल्या मुक मोर्चाने शासन - प्रशासानाचा  लक्ष्यवेध केला या मोर्चात पुरुषांंसोबत महिला ही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या निवेदनात झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय मागे घ्यावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदार आबा महाजन  यांना सकल जैन समाजातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते निवेदन देण्यात आले 

▪️पर्यटन स्थळाच्या यादीतून या तीर्थक्षेत्राचे नाव वगळण्यात यावे 

  केंद्र सरकारने पर्यटन स्थळाच्या यादीत या पवित्र तीर्थक्षेत्राचा समावेश केल्याने याठिकाणी नाॅनव्हेज हाॅटेल्स सुरू होतील पर्यावरणाचे ही नुकसान होईल व या पवित्र तीर्थस्थळाचे पावित्र्य धोक्यात येईल अशी भावना जैन समाजात निर्माण झाली आहे त्यामुळे पर्यटन स्थळाच्या यादीतून सम्मेद शिखरजी या पवित्र तीर्थस्थळाचे नाव वगळण्यात यावे अशी मागणी शिरपूर येथील सकल जैन समाज बांधवांनी निवेदनातून केली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने