शिरपूर प्रतिनिधी - सध्या महाराष्ट्रात थंडीने मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण केला असून तालुक्यातील अनाथ व मतिमंद मुलांना थंडीपासून बचाव व्हावा या शुद्ध हेतूने विचार करून त्यांना एक अनोखी मकर संक्रांतीची भेट परम सुनंदायी फौंडेशनचे सीईओ कल्पेश राजपूत यांनी दिली आहे.
शिरपूर तालुक्यात समाज हिताचे युवा लोकाभिमुख विविध प्रकारचे कार्यक्रम परम सुनंदाबाई फाउंडेशनच्या वतीने नेहमीच राबवले जात असतात त्यांनी राबवलेला मकर संक्रांतीच्या कार्यक्रम हा देखील मानवतावादी कार्यक्रम असून अनाथ आणि मतिमंद मुलांना मायेची उब देणारा असा आहे.
मकर संक्रांत*च्या शुभ मुहूर्तावर परम सुनंदाई फाउंडेशनच्या वतीने शिरपूर येथील अनाथ व मतिमंद विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व आनंद बरेच काही सांगत होते.
या प्रसंगी परम सुनंदाई फाउंडेशनचे संचालक मा. श्री. सुभाषसिंहजी जमादार व सी.ई.ओ. मा. श्री. कल्पेशसिंह राजपूत,चेतना जाधव, मिनल अग्रवाल,प्रतीक्षा मुनेश्र्वर,मनजीत पवार,भूषण जैन,आयुष बाशानी,भूषण जाधव, दरैवसिंह देशमुख उपस्थित होते.
