पुणे: जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे, लहान वयातच व्यवसाय कसा करावा याची माहिती व्हावी, पैशांची देवाण-घेवाण समजावी,खरेदी विक्री,नफा- तोटा याचे ज्ञान होण्यासाठी वनगळी गावातील पारेकरवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज शनिवार दि ७/१/२०२३ बाल आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाल आनंदी बाजाराचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सौ. सावित्री अण्णासाहेब बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,माता पालक बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमामध्ये शाळेतील 22 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तब्बल दहा हजार रुपयांची आर्थिक उलाढाल या उपक्रमांमधून झाली. विविध प्रकारच्या पालेभाज्या,खाद्यपदार्थ, फळे विक्रीसाठी विद्यार्थ्यांनी आणली होती.बाजारातील खरेदीसाठी गावातील महिला,पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बाजारामुळे शाळेचा परिसराला आठवडी बाजाराचे स्वरूप आले होते. लहान मुले बाजारातील वस्तू,फळे, भाज्यांची विक्री करीत असताना पालक वर्ग अतिशय कुतूहलाने पाहताना दिसले. बाजारामध्ये विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये आनंदाचे,उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. या बाजाराला कर्मयोग सहकारी साखर कारखान्याचे संचालक हिरालाल पारेकर,निवृत्त Acp अण्णासाहेब बंडगर, उद्योजक पोपटराव पारेकर माणिकराव पाटील पांडुरंग पारेकर दिपक पाटील अँड अनिल पारेकर, तुकाराम पारेकर, दशरथ पारेकर , रामभाऊ जाधव दादा पारेकर, भाऊसाहेब पारेकर ,शरद पारेकर ,शिवाजी सपकळ, स्वप्ननिल पारेकर दत्तात्रय कामटे, सोमनाथ मदने,गणेश पारेकर, सुरेश पारेकर, अनिल भानुदास पारेकर तसेच गावातील महिला भगिनी विद्याराणी संजय पारेकर, सुनीता पारेकर, सुप्रिया पारेकर, ,अश्विनी पारेकर ,अरुणा शिवाजी कचरे शोभा पारेकर , अरुणा शरद देवकाते, रूपाली दत्तात्रय पारेकर, ताई पारेकर, रंजना वामन पारेकर व शोभा शंकर मारकड गौरी पारेकर बहुसंख्य ग्रामस्थांनी भेट देऊन विद्यार्थ्यांकडून भाजीपाला खरेदी केलया.हा बाल आनंदी बाजार भरविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष घोडके शिक्षिका सविता पवार यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच माता पालक यांनी परिश्रम घेतले.
पारेकरवस्ती जिल्हा परिषद शाळेत भरला बाल आनंदी बाजार प्रतिनिधी दत्ता पारेकर
byMahendra Rajput
-
0
