आर.सी.पटेल आयएमआरडी च्या एम.सी.ए. व इंटीग्रेटेड एम.सी.ए. चे विदयार्थी विदयापीठ गुणवत्ता यादीत

 



शिरपूर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र  विदयापीठ जळगाव मार्फत माहे एप्रिल 2022 वर्षामधील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यात आर.सी.पटेल आय.एम.आर.डी. परिसंस्थेतील 5 विदयार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत परिसंस्थेची परंपरा कायम राखली.


एम.सी.ए. अंतिम वर्षे परिसंस्थेतील कृणाली रविंद्र चौधरी हिने 10.00 ग्रेड मिळवून विदयापीठात प्रथम, अनिकेत विलास सनेर 10.00 ग्रेड विदयापीठात द्वितीय, स्मितल राजेंद्र महाजन 10.00 ग्रेड विदयापीठात तृतीय स्थान मिळविले.


इंटीग्रेटेड एम.सी.ए. अंतीम वर्षामधून परिसंस्थेतील सचिन तेजीलाल गोले 9.85 ग्रेड विदयापीठात प्रथम, मानसी अभय पाटील 9.76 ग्रेड विदयापीठात द्वितीय स्थान मिळविले.


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबददल माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील, परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, एम.सी.ए. विभागप्रमुख प्रा.मनोज बेहेरे, आय. क्यु. ए. सी. समन्वयक डॉ. मनोज पटेल, पदवी विभागप्रमुख डॉ. तुषार पटेल यांनी कौतुक केले.


विद्यार्थ्यांना डॉ. मनोज सोनवणे, प्रा.अमित पाटील, प्रा. विशाल पवार, प्रा. छाया पाटील, प्रा. रोहीणी पाटील, प्रा. राहुल बडगुजर, प्रा. दिपाली नहालदे, प्रा. विठ्ठल पाटील, प्रा. पुजा म्हस्के, प्रा. धनश्री पाटील, प्रा. ऐश्वर्या पाटील या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले, तसेच राजिस्ट्रार सौ. वैशाली गोरले, डी.यु. चौधरी, विशाल माहेश्वरी, सौ. कविता पाटील, सौ. निलिमा पाटील, सौ. भारती भावसार, धिरज शेटे, दिपक बोरसे, किशोर सोनवणे, दिपक दोरीक, सचिन नवले, सलमान पिंजारी, मिलिंद ईंदासराव यांचे मार्गदर्शन लाभले.





Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने