शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरातील क्रांतीनगर लगत असलेल्या पेट्रोल पंपाजवळ महिलेच्या बेवारस स्थितीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाचे वाड बॉय भगवान बोरसे यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकतमात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
शहर पोलीस ठाण्यात दाखल खबर नुसार सोमवारी 12 डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वां. सुमारास शहरातील क्रांतीनगर येथील भोलेनाथ पेट्रोल पंपाजवळ मोकळ्या जागेत अंदाजे ६० वर्षे अनोळखी महिलेच्या मृतदेह मिळून आला. सुनील तुकाराम पावरा रा. तिथिबर्डी तालुका शिरपूर याने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले रुग्णालयातील डॉक्टर वसावे यांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले पुढील तपास पोलीस नायक नितीन पाटील करीत आहेत.
