पुणे:पिंपरी येथे एका तरुणाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांनी तरुणाचा रुद्रावतार पाहून चोरटयांनी दीड लाख रुपये आणि दुचाकी टाकून तिथून पळ काढलेला आहे. पिंपरी परिसरातील मोरवाडी येथे शनिवारी दहा तारखेला ही घटना घडलेली आहे.
तक्रारदार आकाश कुमार विष्णुप्रसाद ( वय 20 राहणार मोरवाडी ) यांनी अकरा तारखेला पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यामध्ये आपण आपले मित्र पृथ्वीराज राठोड यांनी टायरच्या दुकानातील दिवसभर जमा केलेले दीड लाख रुपयाचे कलेक्शन एक्टिवा गाडी ठेवत होतो त्यावेळी तिथे निळ्या रंगाच्या पल्सरवर दोन जण आले आणि त्यांनी आपल्याला दमदाटी करत आपल्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि मित्राच्या हातावर कोयता मारला.
आपल्या सोबत असलेला मित्र पृथ्वीराज याच्या हाताच्या कोपरावर त्यांनी कोयता मारून गाडीची डिकी उघडण्यास सांगितले. तिथे कन्स्ट्रक्शनचे काम सुरू होते त्यावेळी आपण तेथील फावडा घेऊन आरोपीच्या अंगावर धावलो त्यावेळी आरोपी घाबरून गेले आणि त्यांच्या जवळची पल्सर गाडी तिथेच टाकून चक्क पळून गेले असे म्हटले आहे. आकाश कुमार यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे.
%20(1).jpeg)
%20(1).jpeg)