वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेत सर्व अभ्यास मंडळ बिनविरोध

 


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत विविध प्राधिकरणाच्या निवडणुका सुरू आहे. यामध्ये अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळ यासाठी ८ जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. एकूण ४२ अभ्यास मंडळा च्या निवडणुका वेगवेगळ्या विद्याशाखेत होत आहे. त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेत १९ अभ्यास मंडळ, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेत ६ अभ्यास मंडळ, मानवशास्त्र विद्याशाखा ११ अभ्यास मंडळ आणि आंतरशाखीय विद्याशाखेत ५ अभ्यास मंडळाच्या निवडणुकांमध्ये प्राध्यापकांनी नामांकन अर्ज दाखल केलेले आहे. यामध्ये वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखेचे सहा अभ्यास मंडळांवर सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.


अकाउंटन्सी अँड कॉस्टिंग अभ्यास मंडळ

१. डॉ. रश्मी शर्मा (भुसावळ) 

२. डॉ. सचिन जाधव (शिंदखेडा) 

३. डॉ. हेमंत जोशी (धुळे) 


वाणिज्य आणि व्यावसायिक लॉ अभ्यास मंडळ

१. डॉ. दिनेश भक्कड (शिरपूर) 

२. डॉ. चंद्रकांत देवरे (चोपड़ा) 

३. डॉ. योगिता पाटील (शेंदुर्णी) 


व्यवसायिक प्रशासन अभ्यास मंडळ

१. डॉ. गौतम मोरे (तळोदा) 

२. डॉ. भाग्यश्री पाटील (धुळे)

३. डॉ. रवींद्र वाघ (जामनेर) 


कम्प्युटर व्यवस्थापन अभ्यास मंडळ

१. डॉ. राहुल कुलकर्णी (चाळीसगाव) 

२. डॉ. रवी केसुर (फैजपूर) 

३. डॉ. मनोज पाटील (शिरपूर) 


व्यवस्थापन शास्त्र अभ्यास मंडळ

१. डॉ. पराग नारखेडे (जळगांव) 


व्यवसायिक अर्थशास्त्र आणि बँकिंग अभ्यास मंडळ

१. डॉ. विजय मांटे (अमळनेर) 

२. डॉ. निशांत घुगे (जळगांव) 


याप्रमाणे सर्व सदस्यांची अभ्यास मंडळावर बिनविरोध निवड झाली आहे. तसेच वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेत विद्या परिषदेवर मागासवर्गीय प्रवर्गातून डॉ.एस.जे.सरदार यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली आहे.


विद्या परिषद आणि अभ्यास मंडळावर नवनिर्वाचित सर्व सदस्यांचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील सर्व प्राध्यापक, प्राचार्य, महाविद्यालयाकडून अभिनंदन होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने