शिरपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आ. जयवंतराव पाटील यांच्या निलंबन मागे घावे यासाठी शिरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसपार्टी तर्फे उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांना निवेदन देत निलंबनाचा निषेध व्यक्त केला.
विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम घटनाबाह्य हे ईडी सरकार करीत असून त्याचाच एक भाग म्हणून संसदीय मार्गाने विचार मांडणारे संयमी नेतृत्व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.ना. जयंतराव पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात बोलू नये,शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडू नयेत तसेच मुख्यमंत्र्यांवर झालेल्या भूखंडाच्या आरोप व बेळगाव सीमावादावरील लक्ष्य विचलित करण्याच्या हेतूने सताधा-याच्या आग्रहाखातर अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करून लोकशाहीची थट्टा करण्यात आल्याचा आरोप करीत शिरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे मिधे सरकाराचा जाहीर निषेध करून निवेदन दिले. याप्रसंगी रमेश करंकाळ, सय्यद अशपाक, दत्तू पाडवी ,हेमराज राजपूत,युवराज पाटील, इमरान शेख, हिरा भाऊ कोळी ,शंभू खैरनार, गौरव पाटील, डॅनी चांदे, पंकज पावरा आदी उपस्थित होते.
