निमझरी येथील आर. सी. पटेल प्राथमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर सुवर्णपदके
byMahendra Rajput-
0
शिरपूर : धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत 14 वर्षातील गटात निमझरी येथील आर. सी. पटेल प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थिनी पायल भुऱ्या पावरा, अजय मुकेश पावरा यांनी थाळीफेक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तर्फे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत प्राथमिक आश्रम शाळा निमझरीचे विद्यार्थिनी पायल भुऱ्या पावरा थाळी फेक स्पर्धेत सुवर्णपदक तसेच अजय मुकेश पावरा थाळीफेक सुवर्णपदक, 100 मीटर धावणे स्पर्धेत सतीष भायला पावरा द्वितीय व लांब उडी स्पर्धेत सतीष भायला पावरा द्वितीय, 400 मीटर धावणे स्पर्धेत पंकज चिकन पावरा तृतीय, 600 मीटर धावणे स्पर्धेत अजय मुकेश पवार तृतीय क्रमांक पटकावून मैदानी स्पर्धेत यश प्राप्त केले असून या सर्व विद्यार्थ्यांची नाशिक येथे विभाग स्तरावर निवड झाली आहे. या खेळाडूंनी सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, सर्व यशस्वी खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, शाळेचे प्राचार्य पी. डी. पावरा, मुख्याध्यापक पी. एन. लोहार यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक तुषार एम. माळी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.