सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षाच्या अधिकारावर गदा आणली जात आहे.यामुळे लोकशाही धोका निर्माण झाला आहे , लोकशाहीच्या रचनेकरीता हे थांबणे गरजेचे असल्याचे माजी मंत्री डॉ हेमंतराव देशमुख यांनी दोंडाईचा येथे केले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आ.जयंतराव पाटील यांच्या निलंबनाच्या विरोधात शिंदखेडा तालुका,दोंडाईचा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला.माजीमंत्री डॉ हेमंतराव देशमुख, धुळे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापू महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र मराठे अमित दादा पाटील यांनी अप्पर तहसील कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अव्वल कारकून नितिन सोनार यांना निवेदन दिले.
तत्पूर्वी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे , धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र मराठे, अमित पाटील यांनी माल्यार्पन केले.यावेळी केवळ सुडबुद्दीने केलेल्या निलंबनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
माजी नगराध्यक्ष प्रदीप वाणी, माजी प्रभारी नगराध्यक्ष दिनेश चोळके, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामभाऊ माणिक, भुपेंद्र धनगर, दयाराम कुंवर, कय्युम पठाण, महेंद्र पाटील, दिलीप पाटील , नंदु सोनवणे, रमेश बोरसे,भुषण पाटील,अँड रवींद्र मोरे पाटील, अमर मराठे, , ग्रंथालय सेलचे दिपक जगताप, माजी उपसभापती वकील पाटील,रंजाणे माजी सरपंच महेंद्र गिरासे,इंदवेचे माजी सरपंच जितेंद्र सोनवणे, रवींद्र पाटील, राहुल चव्हाण,प्रतिक देशमुख, पंकज चोळके सोनल जाधव, सयाजीराव ठाकरे, जितेंद्र चव्हाण, सुमित गरुड, जितेंद्र तिरमले, बापूजी मिस्तरी,आबीद शेख, अर्जून पाटील , मनोज लोहार मनोज महाजन, भटू मालचे, संजय नगराळे, शिवा खंडाळे, विकास पाटील बापू बागुल, काँग्रेसचे पदाधिकारी राहुल माणिक, वसंत कोळी, हुसेन बोहरी आदी उपस्थित होते.प्रास्ताविक महेंद्र पाटील यांनी केले.पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिनेश मोरे व सहकारी यांनी चोख बंदोबस्त राखला*
