ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय तावखेडा (प्र.न. )ता. शिंदखेडा जि. धुळे येथे संस्थेचे चेअरमन डॉ. बापूसाहेब रवींद्र देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ,थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन व पू. साने गुरुजी यांच्या जयंती निमित्ताने विद्यालयात दिनांक 19 डिसेंबर 2022 ते 24 डिसेंबर 2022 या कालावधीत निपुण भारत व धुळे जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. बुवनेश्वरी सी. यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेल्या बालविवाह निर्मूलन कार्यक्रम विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका श्रीम. प्रतिभा पी. महिरे- वाघ यांच्या अध्यक्षतेखाली व विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक श्री.एन.पी.भिलाणे यांच्या सुयोग्य नियोजनाने उपमुख्याध्यापक श्री. एस. एस. पाटील ,पर्यवेक्षक श्री. सी. झेड्. कुवर ,उपक्रमशील शिक्षक श्री. ए.के. सावंत ,उपक्रमशील शिक्षिका श्रीम. मंगलाताई कुवर ,श्री. पी.एच. लांडगे व श्री नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन,
मांगल्याचे महाकवी पूज्य साने गुरुजी. यांच्या जीवन चरित्रावर विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक श्री.एन.पी.भिलाणे यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमांतर्गत बालविवाह निर्मूलन , स्वच्छता व आरोग्य या विषयावर पथनाट्य, थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन व पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेसह ग्रंथदिंडी चे स्वागत दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन आण्णासाहेब विठ्ठलसिंग गिरासे, तावखेडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, श्रीपाद कुलकर्णी, राजेंद्र कुलकर्णी व कुलकर्णी बंधू भगिनी विद्यालयाचे माजी विद्यार्थी त्याचप्रमाणे गावातील सुज्ञ व सुजान प्रतिष्ठित नागरिक यांनी ग्रंथदिंडीचे उत्साहात स्वागत केले.
उपस्थित पालक बंधू भगिनी यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व विद्यालयातील सर्वच शिक्षक बंधू भगिनी यांचे कौतुक केले व असेच उपक्रम सुरू ठेवून विद्यार्थ्यांची प्रगती साधावी अशी अपेक्षा आपल्या मनोगतातून व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री जितेंद्र नारायण गिरासे, चुडामननाना धनगर व दिलीपआबा पाटील यांनी मेहनत घेतली.
