ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुतेंची तब्येत बिघडली विधिमंडळातून थेट हॉस्पिटलमध्ये भरती प्रतिनिधी दत्ता पारेकर

 


पुणे: माजी मंत्री व भा.ज.पा.चे ज्येष्ठ नेते आमदार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना विधान भवनातून रुग्णवाहिकेतुन खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

बबनराव पाचपुते यांना दुपारी विधान भवनात श्वसनाचा त्रास सुरू झाला.

 बबनराव पाचपुते मागील अनेक दिवसांपासून आजारी आहेत. सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावरही कमी झाला आहे. 

मात्र अधिवेशनाच्या निमित्ताने ते नागपुरात आले आहेत.

 बबनराव पाचपुतेंना त्रास सुरु झाल्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना नेलं. 

तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. 

त्यात त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. 

परंतु पाचपुतेंच्या विनंतीवरून त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.


बबनराव पाचपुचे भा.ज.पा.चे ज्येष्ठ नेते आहेत, 

गेल्या ३५ वर्षांपासून ते आमदार आहेत

एकेकाळचं राष्ट्रवादीतलं मोठं नाव, 

शरद पवार यांचे जवळचे सहकारी राहिले

पण आदिवासी विभागात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी भा.ज.पा.मध्ये प्रवेश केला

याआधी त्यांनी गृहराज्यमंत्री, वनमंत्री, आदिवासी विकास विभागाची धुरा सांभाळली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने