पडस्थळ गावच्या नवनिर्वाचित महिला सदस्यांनी केला इंदापुरच्या तहसीलदारांचा सत्कार... प्रतिनिधी दत्ता पारेकर

 


पुणे:इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतच्या मतदानाचा निकाल दि.20 डिसेंबर 2022 रोजी जाहीर झाला. त्यामध्ये पडस्थळ ग्रामपंचायतचा देखील समावेश होता . प्रथमच होत असलेल्या निवडणुकीमध्ये पडस्थळ ग्रामपंचायत मधील श्री कोटलींनाथ ग्रामविकास पॅनल ची सत्ता प्रस्थापित झाली आहे. त्यामध्ये पुढिल उमेदवार निवडून आले आहेत.सरपंच पदासाठी वैशाली पांडुरंग मारकड व सदस्य पदांसाठी सपना बोंगाणे, विद्या बोंगाणे, बेगम झेंडे, प्रियांका गव्हाणे,अश्विनी कोळेकर, रेश्माताई महेंद्र रेडके  या महिला सदस्यांचा समावेश आहे. 

तालुक्यातील सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याबद्दल मुख्य निवडणूक अधिकारी तथा इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा पडस्थळ गावच्या नवनिर्वाचित महिला सदस्यांनी आभार मानले व  सत्कार केला. यावेळी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे उपस्थित होते. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना रेश्माताई रेडके म्हणाल्या की इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची जबाबदारी श्री पाटील साहेब यांनी उत्तमरीत्या पार पाडली आहे. त्यामुळे आमच्यासारख्या महिला सदस्यांना सन्मानाने काम करता येत आहे. गावच्या विकासासाठी व नवीन योजनांची माहिती व्हावी यासाठी आम्ही पडस्थळ गावच्या सर्व नवनिर्वाचित महिला सदस्या प्रांताधिकारी श्री.दादासाहेब कांबळे व तहसीलदार श्रीकांत पाटील साहेब यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आहे. त्यांनी आम्हाला विकास कामाबद्दलची सर्व माहिती समजावून सांगितली व गावच्या सर्वांगीण विकासासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

यावेळी आभार  सुलन झेंडे यांनी मानले. यावेळी नवनिर्वाचित महिला सदस्या बरोबरच सुरवंता रेडके, रुपाली राऊत, शितल कोळेकर, इंदुबाई झेंडे, अश्विनी रेडके इत्यादी महिला उपस्थित होत्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने