सावळदे येथे श्री दत्त मंदिर येथे १४ डिसेंबर रोजी यात्रोत्सवाचे आयोजन




शिरपूर : तालुक्यातील सावळदे येथे श्री दत्त मंदिर येथे १४ डिसेंबर रोजी यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील उंटावद सावळदे रस्त्यावरील श्री दत्त मंदिर येथे शके १९४४ मार्गशिर्ष ६, बुधवार दि. १४ डिसेंबर २०२२ रोजी श्री दत्त जयंती निमित्ताने यात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी श्री प्रभू दर्शन व यात्रोत्सवाचा लाभा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

श्री दत्त जयंती निमित्ताने रात्री ८ वाजता किर्तनकार. प. पु. श्री. अभयदादा पंजाबी, हिंगोणी यांचे जाहिर किर्तन होणार आहे.

गेल्या वर्षी 10 जानेवारी व 11 जानेवारी 2022 रोजी श्री दत्त व श्री कृष्णा मूर्ती स्थापना व अनेक धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने