दिनांक 12/12/2022 रोजी दुपारी 04.00 वा. सुमारास नंदुरबार शहरातील जाणता राजा चौक ते विमल हाऊसिंग सोसायटी दरम्यान सौ. जयश्री चंपालाल चौधरी वय-47 रा. मातोश्री नगर, जाणता राजा चौक, नंदुरबार हे रस्त्याने पायी फिरत असतांना एक अनोळखी मोटार सायकलवरील दोन इसमांनी त्यांच्या गळ्यात असलेले 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जबरीने हिसकावून नेले म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 773/2022 भा.द.वि. कलम 392,34 प्रमाणे दिनांक 12/12/2022 रोजी अज्ञात आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन घडलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेशीत केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील अनेक सी.सी.टी.व्ही. तपासून अज्ञात आरोपीतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, परंतु CCTV फुटेज अस्पष्ट व दुचाकीला नंबर नसल्यामुळे आरोपीतांची निश्चित ओळख होत नव्हती. दिनांक 17/12/2022 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, नंदुरबार शहरातील जाणता राजा चौकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोराणारा इंद्रीहट्टी ता.जि. नंदुरबार येथील परशा व त्याचा एक साथीदाराने मिळून केलेली असून परशा व त्याचा साथीदार त्याच्या घरी आलेला आहे. सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमखर खेडकर यांना कळवून संशयीत परशा व त्याचा साथीदार यास ताब्यात घेवून माहितीची खात्री करुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांनी त्यांचे तात्काळ एक पथक तयार करुन हंद्रीहट्टी येथे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हंद्रीहट्टी गावात जावून दोन्ही आरोपीतांचा शोध घेतला असता. एका घराच्या अंगणात लिंबाच्या झ डाखाली दोन वेगवेगळ्या मोटार सायकलवर दोन इसम गप्पा करीत असतांना दिसून आले.. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत हुशारीने त्यांच्या आजू-बाजूला सापळा रचला, परंतु पथक त्यांच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी मोटार सायकल तेथेच टाकून तेथून पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका संशयीत इसमास पाठलाग करुन ताब्यात घेतले परंतु एक संशयीत अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. ताब्यात घेतलेल्या संशयीतास नाव गाव विचारले असता परशा ऊर्फ परशराम चैत्राम भिल वय 25 वर्षे रा. इंद्रीहट्टी ता. जि. नंदुरबार असे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेला परशराम भिल यास इतर मालमत्तेविरुध्दचे ना उघड गुन्ह्यांबाबत विचारपूस केली असता, परशराम भिल व त्याच्या साथीदाराने मिळून 7 ते 8 दिवसापूर्वी दुपारच्या वेळी नंदुरबार शहरातील डी मार्ट शॉपींग मॉल समोरील रोडवर एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे पॉलीश असलेली बेन्टेक्सचे मंगळसुत्र जबरीने हिसकावून घेतले होते, परंतु हिसकावून घेतलेले मंगळसूत्र हे सोन्याचे पॉलीश असलेले बेन्टेक्स धातूचे असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते फेकून दिले बाबत सविस्तर हकिगत सांगितली. त्याबाबत उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेख पडताळणी करुन पाहिले असता उपनगर पोलीस ठाणे येथे. 410/2022 भा.द.वि. कलम 393 प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पण झाले
%20(1).jpeg)