शिरपूर : मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट व नारायण सेवा संस्थान, उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 11 रोजी भव्य मोफत अपंग (दिव्यांगजन) कृत्रिम अवयव उपकरण वितरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट शिरपूर व नारायण सेवा संस्थान, उदयपूर (राजस्थान) यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष 'सेवक' प्रशांत भैय्या व एस.व्ही.के.एम. संस्थेचे सह-अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रेरणेतून भव्य मोफत अपंग (दिव्यांगजन) कृत्रिम अवयव उपकरण वितरण शिबीर दि. 11 डिसेंबर 2022 रविवारी दुपारी 1.30 वाजता "राजगोपाल चंदूलाल भंडारी हॉल", आर. सी. पटेल मेन बिल्डींग ग्राऊंड, शिरपूर जि. धुळे येथे संपन्न होत आहे.
रुग्णांच्या सेवेसाठी भूपेशभाई पटेल फ्रेंडस् सर्कल मार्फत सेवाभावी आयोजन करण्यात आले आहे.
यापूर्वी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट शिरपूर व नारायण सेवा संस्थान उदयपूर राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने 25 ऑगस्ट 2022 रोजी देखील "आत्मीय स्नेहसंमेलन" तसेच भव्य मोफत अपंग, दिव्यांगजन शस्त्रक्रिया, कृत्रिम अवयव, पोलिओ तपासणी, उपकरण वितरण शिबीर आर. सी. पटेल मेन बिल्डिंग येथे "राजगोपाल चंदुलाल भंडारी हॉल" मध्ये आयोजित करण्यात आले होते. तेव्हा सर्व गरजू अपंग रुग्णांना कृत्रिम हाथ, पाय, कुबडी, व्हील चेअर्स, काठी इ. साहित्य देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सर्व साहित्य वाटप आ. काशिराम पावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत
दि. 11/12/2022 रोजी दुपारी 1.30 वाजता करण्यात येईल.
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातून शिरपूर शहर व तालुक्यातील असंख्य गरजू रुग्णांना सढळ हाताने मदत करण्याचे काम पटेल परिवाराच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून अहोरात्र सुरू आहे. मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट शिरपूर व नारायण सेवा संस्था उदयपूर राजस्थान यांचे संस्थापक चेअरमन कैलास मानव व अध्यक्ष सेवक प्रशांत भैय्या यांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.
