शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहराचे लाडके नेतृत्व कर्तुत्ववान जनसेवक स्वर्गीय चंदन सिंग राजपूत यांनी नेहमीच लोकसेवेत व जनसेवेत आपले स्वतःचे रक्त आटवून जनसेवा केली या सच्चा जनसेवकास आज रक्तदान करून मित्र मंडळ व समाज बांधवांनी त्यांच्या कार्यास सलाम करत अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.
स्व.चंदन आबा यांच्या स्वर्गवास होऊन आज तारखेप्रमाणे वर्षपूर्ती झाली. आणि म्हणून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ चंदन आबा फाउंडेशन, नेताजी ग्रुप व युथ फ्रेंड सर्कल यांनी जीवन ज्योती ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी स्वर्गीय चंदन आबांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून रक्तदान शिबिराच्या कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात शेकडो रक्तदात्यांनी व मित्रपरिवारांनी रक्तदान करून स्वर्गीय चंदन आबा यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले.
शिवाय गरजू व गरीब नागरिकांना ब्लॅंकेट वाटप करून मित्रमंडळाने चंदन आबांच्या कार्याप्रती व्यक्त करत जनसेवा करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सदर कार्यक्रमास नेताजी ग्रुप, युथ फ्रेंड सर्कल, चंदन आबा फाउंडेशन चे सर्व मित्र परिवार समाज बांधव व विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळेस उपस्थित होते.
स्वर्गीय चंदन आबा यांच्या स्मृती प्रित्यर्थ नेताजी केबल नेटवर्कच्या प्रांगणात लवकरच चंदन आबांच्या पुतळ्या रुपी प्रतिकृतीचे स्थापना होणार असून आबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मित्रपरिवार यापुढे देखील असेच विविध जनसेवेचे व लोकाभिमुख कार्यक्रम राबवून आबांप्रती संवेदना व्यक्त करतील व त्यांचे अपूर्ण जनसेवेचे कार्य मित्रपरिवार पूर्ण करण्याच्या प्रयत्न करेल अशी भावना यावेळेस सर्वांकडून व्यक्त करण्यात आली. आणि सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला व स्वर्गीय चंदन आबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली म्हणून मित्र मंडळाकडून आभार व्यक्त केले गेले.


