वाचनालयाचा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम*




शिरपूर तालुक्यातील आढे येथील लोकमान्य टिळक सार्वजनिक वाचनालय व क्षत्रिय शिवराणा बहुउद्देशिय संस्था,आढे यांच्या सयुक्त विध्यमानाने वाचनालयाच्या 13 व्या वर्धापण दिनानिमित्त वाचनालयाच्या कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
       कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक व डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.ग्रंथप्रदर्शन,मार्गदर्शन कार्यक्रम,स्वच्छता अभियान,वाचन सप्ताह,वृक्षारोपण आदी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पोलीस पाटील तथा क्षत्रिय शिवराणा संस्थेचे अध्यक्ष राजकिरण राजपूत,वाचनालयाचे अध्यक्ष रणजितसिंग गिरासे,जयपालसिंग गिरासे,संगीता गिरासे,विविध मान्यवर उपस्थित होते.ग्रंथ प्रदर्शन पाहण्यासाठी विध्यार्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वितेसाठी ग्रंथपाल दक्षा गिरासे,सहायक आशा राजपूत,संस्थेचे पदाधिकारी आदिनी सहकार्य केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने