करवंद नाका परिसरात प्रसाधनगृह बांधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवेदन




शिरपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरपूर शहर च्या वतीने आज मुख्याधिकारी सो शिरपूर वरवडे नगरपरिषद येथे निवेदन देण्यात आले. सार्वजनिक प्रसाधन गृह नव्याने बांधणे बाबत अनेक वर्षापासून करवंद नाका येथील प्रसाधन गृहात मूत्रविसर्जन करत असताना तेथेच बाजूला विद्यार्थी विद्यार्थिनी उभे राहत असे व अनेक विद्यार्थिनींना बस स्टॉप च्या जागेवरून पुढे पळवाट करावी लागते म्हणून अनेक विद्यार्थिनीची बस सुटते व या अनुषंगाने नव्याने श्री पुरुष प्रसाधनगृह येथे उभारण्यात यावे व बाजूला खेड्यावरती येणाऱ्या विद्यार्थिनी साठी बस स्टॅन्ड बांधण्यात यावे म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना बस स्टॅन्ड ला थांबण्याची व बसण्याची सोय होईल शिरपूर शहरात असे एकमेव ठिकाण असे आहे की त्याचे गर्दीचे स्वरूप खूप जास्तीचे असते म्हणून त्याचे लवकरात लवकर प्रसाधनगृह बांधण्याच्या अंमलबजावणी करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन सुपूर्त केले व आठ दिवसाची नगरपालिकेला वेळ दिली असून आठ दिवसात प्रसाधन गृह बांधण्यात नाही आले तर मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले. निवेदना वेळी राकेश नवनीत चौधरी धुळे जिल्हाध्यक्ष.. पंकज भाऊ शहर उपाध्यक्ष.. चेतन सिंग राजपूत शहराध्यक्ष विकी पाटील शहर उपाध्यक्ष.... वावड्या पाटील नक्षत्र पाटील निश्चल जैन तुषार बारी जयेश पाटील पराग दलाल मुकेश मराठे चंदू शिंपी उमेश चित्ते केतन भंडारी धनंजय पाटील निशांत राजपूत जय राजपूत राजू कोळी संदेश वाघ अशोक खंडेलाल अनेक कार्यकर्ता उपस्थित होते .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने