धुळे जि. प. सभापती पदांसाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न





जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीनंतर चार विषय समिती सभापती निवडीची प्रक्रिया पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी तृत्पी धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सत्ताधारी भाजपातर्फे सभापती पदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. तथापि, जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता असल्याने यावेळी शिंदखेडा तालुक्यास दोन आणि शिरपूर व साक्री तालुक्यास एक सभापती देण्याचा निर्णय यापुर्वीच घेण्यात आला होता. मात्र नावे जाहीर न करता सस्पेन्स कायम होता.


जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदी हर्षवर्धन दहिते यांची वर्णी लागली आहे. तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी संजीवनीताई सिसोदे यांना संधी देण्यात आली. समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी कैलास पावरा तर शिक्षण आरोग्य समितीच्या सभापतीपदी महावीरसिंह रावल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. त्यानंतर भाजप पदाधिकारी व कार्यकत्यांनी एकच जल्लोष केला. तसेच जि. प. अध्यक्षा अश्विनीताई पाटील यांनीही नुतन सभापतींचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने