लाच घेतल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह सहाय्यक शिक्षक एसीबीच्या जाळ्यात




धुळे प्रतिनिधी - पाच हजारांची लाच घेतली म्हणून धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथील एका मुख्याध्यापका सह एका शिक्षकास एसिबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की सोनगीर येथील एन .जी. बागुल हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी सहाय्यक शिक्षकांच्या मदतीने कारणे दाखवा नोटीसीवर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितली होती पाच हजार रुपयाची लाच स्वीकारल्यानंतर एसीबीने दोघांना पकडले असून यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहेत त्यांना शाळेचे मुख्याध्यापक भानुदास हिरामण माळी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली होती याबाबत तक्रारदार हे मुख्याध्यापक माळी यांना भेटण्यास गेले असता त्यांनी शाळेतील सहाय्यक शिक्षक हाजीब खान पठाण यांना भेटण्यास सांगितले त्याप्रमाणे तक्रार यांनी सहाय्यक शिक्षक पठाण यांची भेट घेतली असता पठाण यांनी तक्रारदार यांना देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीसीवर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांच्या राज्याची मागणी केली.

त्यामुळे तक्रारदार यांनी एसीबी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करून सहाय्यक शिक्षक पठाण यांनी तक्रारदार यांच्याकडे तळजोड अंती ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यासाठी एसीबीने सापडा रचून सदर लाचेची मागणी स्वीकारताना सोनगिरी येथील पोलीस ठाण्यासमोरील मुंबई आग्रा महामार्गालगत रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी दोघांविरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनजीतसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे तसेच राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर ,संतोष पावरा, भूषण शेटे, संदीप कदम ,रोहिणी पवार ,रामदास बारेला, गायत्री पाटील, वनश्री बोरसे, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील ,सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, इत्यादींच्या पथकाने केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने