खोके सरकारच्या विरोधात उद्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन



शिरपूर प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या हक्काचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडणवीस यांच्या खोके सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिरपूर तर्फे उद्या दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रांत कार्यालय शिरपूर येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

 महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडवणीस सरकारच्या विरोधात "उद्योगाचे विमान गुजरातला बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला" हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे .
 
या आंदोलनांतर्गत मोदी, शहा शिंदे, फडवणीस, उदय सामंत यांचे फोटो असणारी कागदी विमाने हवेत उडून निषेध करण्यात येईल. तसेच गाजरे हातात घेऊन शिंदे-फडणीस सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येईल....!!  
१. महाराष्ट्राचे गद्दार..गुजरातचे वफादर..! 
 २. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचा निषेध..!  
३. गुजरात तुपाशी..महाराष्ट्र उपाशी...! 
 ४. द्या आमच्या रोजगाराची हमी.. बंद करा गुजरातची गुलामी..!  
५.फडवणीस खातात महाराष्ट्राची भाकरी...करतात गुजरातची चाकरी, गुलामी..!  
६. शिंदे फडवणीस यांच्या फेकू गप्पा... महाराष्ट्रद्रोही भाजपा..! महाराष्ट्र द्रोही भाजपा.! 
 ७. गद्दारांना 50 खोके.. महाराष्ट्राला धोके.                            ८ नोटबंदी, जीएसटी ,कोविड महामारी, अतिवृष्टी यामुळे स्थानिक उद्योग बंद पडत आहे त्यावर करवाढीचा उद्योग सत्ताधारी मंडळी करीत आहे
 ९. शिरपूर धुळे जिल्ह्यातील, सर्व सहकारी प्रकल्प, संस्था बंद करुण अनेक प्रॉपर्टींवर बँकांकडून अवाजवी कर्ज घेतले आहे. बेरोजगारी ,महागाई वाढली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे

असे विविध मुद्द्यांना सामोरे ठेवून राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे सदरचे आंदोलन केले जाणार असून या आंदोलनात सर्व पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन   डॉ मनोज महाजन (जिल्हाध्यक्ष) राष्ट्रवादी युवक काँग्रेस,धुळे  सर्व पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शिरपूर शहर व तालुका जिल्हा धुळे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने