दोंडाईचा येथील श्रीमती बसंतीबाई पाबुदानजी संचेती रोटरी प्री- प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये एक जुलै डॉक्टर दिनानिमित्त शिक्षकवृंदांनी नाट्याचे सादरीकरण केले .
यात नर्सरी ते सीनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. समाजसेवेसाठी अथक परिश्रम करणाऱ्या आरोग्य सेवा कर्मचार्यांचे व डॉक्टरांचे महत्त्व मयुरी भदाणे , दीपमाला ठाकूर,जया सोनवणे व स्वाती गोसावी यांनी आपल्या नाट्यातून विद्यार्थ्यांना पटवून नाटकात डॉक्टरांच्या विविध प्रकारचे साधनांचे नाव व त्यांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
त्याचबरोबर जंक फूड व हेल्दी फूड याचे फायदे व तोटे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनीही स्वतः बनविलेले ग्रीटिंग कार्ड आपल्या परिसरातील डॉक्टरांना देऊन डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी व पालकांनी यात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
रोटरी स्कूलचे अध्यक्ष श्री हिमांशु शाह, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी,डॉ.आशाताई टोणगांवकर , प्राचार्य श्री एम.पी. पवार यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्कूलच्या इन्चार्ज बतुल बोहरी तसेच सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Tags
news
