टाकरखेडा येथे सूर्यकन्या तापी मातेचा जन्म उत्सव निमित्ताने पूजन. साडी चोळी चा आहेर देऊन पूजन.




                दोंडाईचा ( वि.प्र.)टाकरखेडा येथे तापीमाईच्या जन्म उत्सव निमित्ताने सालाबादप्रमाणे विधीवत पूजन करण्यात आले.
  आज सकाळी तापी मातेच्या नदीपात्रात साडी चोळी चा आहेर  देऊन जन्म उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तापी मातेचे पूजन करुन पुष्पहार साडी चोळी चा आहेर अर्पण करण्यात आला.
 सामाजिक कार्यकर्त्या अनिता नरेंद्रसिंग गिरासे,टाकरखेडाच्या सरपंच बानूबाई मालचे भारती गिरासे, सुनिता गिरासे, सुरेखा गिरासे, शोभा गिरासे,कोकीळा गिरासे,नंदा गिरासे, सुशिला गिरासे, लता गिरासे, कविता गिरासे, मनिषा गिरासे,बालूबाई जाधव,बबनबाई गिरासे, संगीता गिरासे, अनिता पटेल, आशा पटेल,शिला पटेल,छोटूभाई पटेल,रमेशसिंग गिरासे,भरतसिंग गिरासे,भरतसिंग जाधव आदी उपस्थित होते.
 सूर्यकन्या तापी मातेचा आषाढीच्या सप्तमीला गावकऱ्यांकडून मनोभावे जन्म उत्सव साजरा केला जातो.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने